गुजरात हद्दीत नंदुरबार जिल्ह्यातील व्यापा:यांची लूट
By Admin | Updated: May 22, 2017 13:45 IST2017-05-22T13:45:14+5:302017-05-22T13:45:14+5:30
तळोदा व अक्कलकुवा परिसरात विविध व्यवसाय करणा:या व्यापा:यांवर हल्ला करून त्यांची लूट करण्याच्या घटना गुजरात हद्दीत घडत आहेत़

गुजरात हद्दीत नंदुरबार जिल्ह्यातील व्यापा:यांची लूट
नंदुरबार : तळोदा व अक्कलकुवा परिसरात विविध व्यवसाय करणा:या व्यापा:यांवर हल्ला करून त्यांची लूट करण्याच्या घटना गुजरात हद्दीत घडत आहेत़ शनिवारी रात्री नंदुरबार तालुक्यातील व्यापा:याला गुजरात हद्दीत चौघांनी लुटल्याची घटना घडली़
नंदुरबार तालुक्याला लागून असलेल्या निझर आणि तळोदा तालुक्याला लागून असलेल्या कुकरमुंडा हद्दीत हे गुन्हे घडले आह़े 14 मे रोजी सिंधी कॉलनीतील एका व्यापा:यास भर दुपारी निझर उच्छल रोडवर लुटण्यात आले होत़े तर शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसात गुजरात राज्यातील निंभोरा फाटा ते सद्गव्हाण या दरम्यान लुटीचे प्रयत्न झाल़े लुटारूंनी अखेर शनिवारी रात्री नंदुरबारच्या व्यापा:यावर हल्ला चढवत रक्कम पळवून नेली़
शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास गुजरात हद्दीतील सदगव्हाण गावाजवळ सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामामुळे तयार केलेल्या कच्च्या रस्त्याने तळोदा येथून रात्री आठ वाजेच्या सुमारास एमएच 24 एएफ 0428 या वाहनाने नंदुरबारकडे जाणा:या शरदचंद्र रमेश पाटील (32) यांचे वाहन चार अज्ञात व्यक्तींनी अडवल़े पुलाचे काम सुरू असल्याने कामगार असतील म्हणून शरदचंद्र पाटील यांनी थांबवले असता, चौघांनी गाडीत प्रवेश करत दोघांनी त्यांना पकडून ठेवले व इतर दोघांनी त्यांच्याजवळील कापडी पिशवीतील एक लाख 56 हजार 600 रूपये घेऊन पसार झाल़े
रहदारीच्या मार्गावर रात्री आठ वाजता घडलेली ही घटना समोरून येणा:या एका ट्रकचालकाला आल्याने त्याने हॉर्न देऊन मागून येणा:या काही ट्रकचालक आणि राज्य परिवहन एसटी चालकाला सावध केल़े चौघा दरोडेखोरांकडे विविध प्रकारचे हत्यार असल्याची माहिती आह़े ते याठिकाणी नेमके असे आले असावेत याबाबत माहिती नाही, मात्र चौघे जवळच्या शेतांकडे पळाल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आह़े