नवापूर आगारातून लांब पल्ल्याची बससेवा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:22 IST2021-06-05T04:22:50+5:302021-06-05T04:22:50+5:30

नवापूर आगारातील चालक, वाहक व वाहतूक नियंत्रक यांना आदेश देण्यात आले की, ३ जून २०२१ पासून टप्प्याटप्प्याने बससेवा सुरू ...

Long distance bus service starts from Navapur depot | नवापूर आगारातून लांब पल्ल्याची बससेवा सुरू

नवापूर आगारातून लांब पल्ल्याची बससेवा सुरू

नवापूर आगारातील चालक, वाहक व वाहतूक नियंत्रक यांना आदेश देण्यात आले की, ३ जून २०२१ पासून टप्प्याटप्प्याने बससेवा सुरू करण्यात येणार आहे. धुळे विभागातील आगारप्रमुखांनी चालक व वाहक यांना कर्तव्यावर हजर राहण्याच्या सूचना केल्या आहेत. नवापूर आगारातून धुळे, नाशिक, जळगाव, नंदुरबार, शिरपूर, शहादा आदी ठिकाणी ५० टक्के आसन क्षमतेनुसार बसेस सुरू करण्यात आल्या आहेत.

असे आहे बसचे वेळापत्रक

नवापूर-नंदुरबार बस सकाळी साडेसहा, साडेआठ, साडेनऊ, सकाळी ११ व दुपारी एक वाजता नवापूर बसस्थानकावरून सुटणार आहे. नवापूर येथून नाशिकसाठी दोन बसेस सुरू केल्या आहेत. पहिली बस सकाळी साडेसात, तर दुसरी बस दुपारी १२ वाजता सोडण्यात येणार आहे. नवापूर ते शहादा ही बस सकाळी १० वाजता सोडण्यात येईल. नवापूर आगारातून धुळ्यासाठी दोन बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. त्यात पहिली बस सकाळी आठ, तर दुसरी बस दुपारी १२ वाजता सोडण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सूत्रांनी दिली. प्रवाशांनी बसमध्ये बसताना तोंडाला मास्क, फिजिकल अंतर, घरी गेल्यावर हात स्वच्छ धुणे या नियमावलीचे पालन करणे गरजेचे आहे.

Web Title: Long distance bus service starts from Navapur depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.