विवाहितेच्या छळप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा लोकमत न्यूज नेटवर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 12:13 IST2019-09-04T12:13:10+5:302019-09-04T12:13:15+5:30
नंदुरबार : नवापुर येथील माहेर असलेल्या विवाहितेचा सासरच्यांनी संशयातून छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आह़े सदर विवाहितेचा 2004 ...

विवाहितेच्या छळप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवापुर येथील माहेर असलेल्या विवाहितेचा सासरच्यांनी संशयातून छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आह़े सदर विवाहितेचा 2004 पासून हा छळ सुरु होता़
कविता विजय वाघ रा़ नवापुर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती विजय उद्धव वाघ रा़ वेल्हाणे ता़ धुळे, अक्काबाई मधुकर वेंदे रा़ सुरत, मधुकर वेंदे, विमलबाई पगारे दोन्ही रा़ नवसारी गुजरात व अंबर ऊर्फ तात्या वाघ रा़ वेल्हाणे यांनी 2004 पासून आतेभावासोबत अनैतिक संबध असल्याचा संशय घेत वेळोवेळी शारिरिक व मानसिक त्रास दिला होता़
याप्रकरणी महिला तक्रार निवारण कक्षात अर्ज दाखल होता़ त्यावर कारवाई करण्यात आल्यानंतर सोमवारी चौघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद वंजारी करतआहेत़