लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णा भाऊ साठे जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:11 IST2021-08-02T04:11:38+5:302021-08-02T04:11:38+5:30
अक्कलकुवा : येथील फस्ट आयडिया इंटरनॅशनल स्कूल येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थांनी ऑनलाइन मनोगत व्यक्त ...

लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णा भाऊ साठे जयंती साजरी
अक्कलकुवा : येथील फस्ट आयडिया इंटरनॅशनल स्कूल येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थांनी ऑनलाइन मनोगत व्यक्त केले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी, मनोज चौधरी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमासाठी प्राचार्य डी. बी. ॲलेक्झेंडर, गौतमसिंग वळवी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सन्मित्र क्रीडामंडळ, शहादा
शहादा येथील सन्मित्र क्रीडामंडळ व अटल बिहारी वाजपेयी सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमानाने लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी प्रा. लियाकत अली यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रा. ज्ञानी कुलकर्णी, संपत कोठारी, डॉ. खलील शाह, प्रदीप पाटील, आ. टी. पाटील, राजेंद्र माळी, के. के. सोनार, ॲड. गोविंद पाटील, इंजि. अनिल पाटील, पिनाकिन पटेल, शिवपाल जांगिड आदी उपस्थित होते. प्रा. ज्ञानी कुलकर्णी व प्रदीप पाटील यांनी लोकमान्य टिळक आणि अण्णा भाऊ साठे यांचा कार्याचा गौरव केला. सूत्रसंचालन संपत कोठारी यांनी केले.
मोहिदे त. श. येथे अभिवादन
शहादा तालुक्यातील मोहिदे त. श. येथे प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अण्णा भाऊ साठे यांचा प्रतिमेचे पूजन सरपंचच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य जिजाबाई ठाकरे, माजी जिल्हा परिषद सदस्य रणसिंग ठाकरे, सरपंच पुरुषोत्तम पाटील, माजी उपसरपंच अण्णासाहेब पाटील, पोलीसपाटील मुकेश गवळे, महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लाल बावटा मोहिदे युनिटचे सचिव संतोष गायकवाड, सक्षम बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुधीर ठाकरे, गणेश पवार, ग्रामपंचायत सदस्य अरुणाबाई महिरे, प्रकाश गिरासे, रवींद्र पिंपळे, कलुबाई भिल उपस्थित होते.
यावेळी सुधीर ठाकरे व गणेश पवार यांनी बहुजन समाजाची सद्य:स्थिती व वैज्ञानिक दृष्टिकोन याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास सतीलाल महिरे, ईश्वर खैरनार, एकनाथ खैरनार, विमलबाई पाचुरणे, यमुनाबाई पाचुरने, शांताबाई शिंदे, संगीता पाचुरने, मधुकर गायकवाड, शरद बैसणे, सुखदेव पानपाटील, कृष्णा महिरे, अशोक पाचुरने, सुभाष पाचुरने, चतुर सोनवणे, दीपक मोरे, सोनू निकम, खंडा मोरे, किरण कुवर, किरण बैसाणे, नाना पाचुरणे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष गायकवाड, तर आभार किशोर पाचुरने यांनी मानले.
सरदार पटेल प्राथमिक शाळा, नंदुरबार
नंदुरबार शहरातील सरदार पटेल प्राथमिक शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सीतादेवी चौरे होत्या. प्रारंभी अध्यक्षांच्या हस्ते लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी वक्ते म्हणून जयश्री पाटील व चेतन पाटील उपस्थित होते. यावेळी इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. सूत्रसंचालन अमोल पाटील व आभार नीलेश चौधरी यांनी मानले.