‘लॉकडाऊन’मुळे विसरवाडी बाजारपेठेत पसरली अवकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 12:42 IST2020-03-28T12:41:08+5:302020-03-28T12:42:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : धुळे -सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा व विसरवाडी-सेंधवा महामार्गावर वसलेले नवापुर तालुक्यातील विसरवाडी गाव ...

‘लॉकडाऊन’मुळे विसरवाडी बाजारपेठेत पसरली अवकळा
लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : धुळे -सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा व विसरवाडी-सेंधवा महामार्गावर वसलेले नवापुर तालुक्यातील विसरवाडी गाव आहे. लॉकडाऊनमुळे पूर्णपणे प्रभावित झाले असून व्यापारीपेठ गजबजणाऱ्या विसरवाडी गावावर गेल्या पाच दिवसांपासून अवकळा पसली आहे़
विसरवाडी हे गाव दोन आंतरराज्यीय महामार्गावर वसलेले तालुक्यातील व जिल्ह्यातील नावलौकिक असलेली मोठ्या बाजारपेठेचे गाव आहे़ गावाची लोकसंख्या सुमारे १२ हजार असून येथील बाजारपेठेत परिसरातील ४० ते ५० खेड्यांचा दैनंदिन संपर्क येतो. बाजारपेठ प्रशस्त व जिल्ह्यात नावलौकिक प्राप्त असल्याने बाहेरगावाहून मोठ्या संख्येने व्यापारी येथे येऊन व्यापार करतात़ मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे विसरवाडी बाजारपेठेसह गावातही शुकशुकाट असून आजवर अशी शांतता येथील नागरिकांनी कधीच अनुभवली नसल्याचे बोलले जात आहे़ कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आधी महाराष्ट्र आणि नंतर केंद्र सरकारने तातडीची पावले उचलत कारवाई केली होती़ यात जमावबंदी आदेश व नंतर संचारबंदी लागू करण्यात आली़ पाठोपाठ लॉकडाऊनची घोषणा झाली़ यातून पहिल्याच दिवशी गैरसमज निर्माण होऊन रात्रीच किराणा दुकानांवर गर्दी उसळली होती़ यावेळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांनी गावात भेटी देत नागरिकांना मार्गदर्शन केले़ गर्दी करु नये असे सांगितल्यानंतर दुकाने बंद झाली होती़ यातून मंगळवारपासून सुरळीतपणे जीवनावश्यक वस्तंूचे वितरण सुरु आहे़
नवापुर आणि धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याला लागू असलेल्या विसरवाडी येथे दोन्ही जिल्ह्यातील ग्रामस्थांसोबतच दोन्ही महामार्गांवरुन जाणाºया वाहनांचा राबता असतो़ यातून मग लॉकडाऊननंतर पोलीस, महसूल आणि पंचायत समिती प्रशासनाने याठिकाणी दक्षता घेत उपाययोजनांना प्राधान्य दिले आहे़ सध्या गावात पोलीस अधिकारी व कर्मवारी हे सातत्याने गस्त घालून गावात विनाकारण भटकंती करणाऱ्यांवर कारवाई करत आहेत़ कारवाईदरम्यान पोलीस युवकांना योग्य ती माहिती देत घरीच राहण्याचे सुचवत आहेत़
ग्रामपंचायतीमार्फत दुकानदारांना अत्यावश्यक सेवा देणारे दुकाने कधी व किती वेळ सुरु ठेवली पाहिजेत याबाबत माहिती दिली जात आहे़ यासाठी ग्रामपंचायतीने पत्रके वाटप केली आहेत़ गावात प्रत्येक दुकानाच्या बाहेर ग्राहकांना उभे राहण्यासाठी विशिष्ट अंतरावर चौकट आखून दिली आहे़ औषधी विक्रीचे दुकाने सुरु आहेत़ किराणा भाजीपाला, पिठाची गिरणी सकाळी आठ ते दुपारी १२ पर्यंत सुरु आहेत़ विसरवाडी येथे दर गुरुवारी आठवडे बाजाराची परंपरा आहे़ जिल्ह्यातून व्यापारी मोठ्या संख्येने येथे येत असल्याने ही बाजारपेठ प्रसिद्ध आहे़ आठवडे बाजार बंद असल्याने मोठे नुकसान होत आहे़ दरम्यान गावातील घराघरातही कोरोनाची भिती असल्याने बाहेर निघणे टाळले जात आहे़ बाहेरगावी गेलेल्यांची तपासणी करुनच त्यांना गावात घेतले गेल्याची माहिती असून रुग्णालयात सध्या गर्दी आहे़
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसरवाडी ग्रामपंचायतीतर्फे नवापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, सरपंच बकाराम गावित, विस्तार अधिकारी दिलीप कुवर, ग्राम विकास अधिकारी कैलास सोनवणे तसेच कर्मचारी वेळोवेळी विसरवाडी येथे ग्रामस्थांना व दुकानदारांना मार्गदर्शन करीत आहेत तसेच लहान मुलांना वृद्ध व्यक्तींना घरीच ठेवावे सर्वांनी तोंडाला मास्क बांधावा असे सांगितले जात आह़े
गावातील दोन्ही महामार्गावरील त्याप्रमाणे गावातील हॉटेल व्यवसाय गेल्या पाच दिवसापासून बंद अवस्थेत आहेत़ यामुळे हॉटेल कामगारांची स्थिती बिकट झाली आहे़ गावातील सर्व प्रार्थना स्थळांना कुलुप लावण्यात आले आहे.