गणेश मूर्ती उद्योगाला लॉकडाऊनचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 12:12 IST2020-05-13T12:12:41+5:302020-05-13T12:12:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शतकाची परंपरा असलेल्या नंदुरबार शहरातील गणेशोत्सवावर यंदा कोरोनाचे सावट आहे़ अद्याप उत्सवाला वेळ असला ...

Lockdown hits Ganesh idol industry | गणेश मूर्ती उद्योगाला लॉकडाऊनचा फटका

गणेश मूर्ती उद्योगाला लॉकडाऊनचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शतकाची परंपरा असलेल्या नंदुरबार शहरातील गणेशोत्सवावर यंदा कोरोनाचे सावट आहे़ अद्याप उत्सवाला वेळ असला तरी मे महिन्यात सुरु होणारे गणेशमूर्ती तयार करणारे कारखानेही बंद असल्याने मूर्तीकारांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे़ तूर्तास शहरात तीनच ठिकाणी कारखाने सुरु असल्याची माहिती आहे़
शाडू माती, पीओपी व सिरॅमिकसह काळ्या मातीपासून मूर्ती तयार करण्याच्या अनोख्या पद्धतीमुळे नंदुरबार शहर संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे़ गुजरात राज्यातील बहुसंख्य मंडळेही येथून मूर्ती घेऊन जातात़ मे महिन्यापासून शहरातील बहुसंख्य कारखाने सुरु होण्याची परंपरा आहे़ परंतू यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे कारखाने पूर्णपणे बंद आहेत़ यातून वार्षिक व्यवसाय असलेले मूर्तीकार घरी बसून आहेत़ मे व जून महिन्यात अनेक मंडळे येऊन मूर्तींची बुकींग करत असल्याने लहान आणि मोठ्या अशा दोन्ही मूर्तींच्या निर्मिती प्रक्रियेला वेग दिला जातो़ परंतू वाहतूक बंद असल्याने परजिल्ह्यातून मागवले जाणारे पीओपी, शाडू माती, रंग, सूत यासह मूर्ती तयार करण्यासाठी लागणारा इतर कच्चा मालही मूर्तीकारांपर्यंत पोहोचू शकलेला नाही़ शहरात तब्बल १५० पेक्षा अधिक कारखाने आहेत़ दरवर्षी हे कारखाने किमान १ लाख मूर्तींची निर्मिती करतात़ यातून लाखो रुपयांची उलाढाल होते़ गेल्या काही वर्षात हा बाजार ग्लोब होऊन व्हॉटसअप किंवा इतर सोशल मिडियातून आॅनलाईन बुकींग करण्यात येते़ यंदा मात्र हे सर्वच शांत असून मूर्ती कारखान्यांवर गुजराण होणाऱ्या कुंभार समाज बांधवांसह कौशल्याने मूर्ती तयार करणाºया इतर कारागिरांवर संकट कोसळले आहे़
दरम्यान शहरातील मंडळाकडूनही अद्याप यंदाच्या उत्सवाबाबत निर्णय घेण्यात आलेला नसल्याची माहिती आहे़ काही ठिकाणी साधेपणाने उत्सव साजरा होण्याची शक्यता असून यासाठी लहान मूर्तींनाच प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे़

डिसेंबरपासूनच काम सुरु होते़ परंतू यंदा कोरोनामुळे ते काम बंद पडले आहे़ साहित्य नसल्याने शहरातील अनेक कारखाने बंद पडले आहेत़ लॉकडाऊन उघडताच मूर्ती तयार करण्यास सुरुवात करणाऱ
-सुनील चौधरी, मूर्तीकार,
नंदुरबाऱ

अद्याप कोणत्याही निर्णयावर चर्चा झालेली नाही़ येत्या काळात त्यावर निर्णय होईल़ परंतू कोरोनाचे भय कायम राहिल्यास उत्सव साधेपणानेच साजरे करण्यावर भर देऊ़
-सुनील सोनार, पदाधिकारी, बाबा गणपती मंडळ, नंदुरबाऱ

Web Title: Lockdown hits Ganesh idol industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.