शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

लॉकडाऊनमुळे नंदुरबार आगाराचे १६ कोटीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 12:26 PM

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार महिन्यांपासून बंद असलेल्या नंदुरबार एसटी आगाराचे सुमारे १६ ...

भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार महिन्यांपासून बंद असलेल्या नंदुरबार एसटी आगाराचे सुमारे १६ कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे़ या नुकसानीमुळे आगाराला फटका बसला असून कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतनही थकले आहे़लॉकडाऊनपूर्वी नंदुरबार आगारातून जिल्ह्यातील सहा तालुके, राज्यातील विविध शहरे आणि गुजरात व मध्यप्रदेश राज्यातील शहरांपर्यत नंदुरबार आगाराच्या बसेस धावत होत्या़ यातून दिवसाला किमान १४ लाख रूपयांचे सरासरी उत्पन्न प्राप्त होत होते़ कोरोना संसर्ग थोपवण्यासाठी २२ मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती़ या घोषणेपासून किमान दोन महिने बंद असलेली एसटी जून महिन्यात रस्त्यावर आली होती़ परंतु मोजक्याच फेºया होत असल्याने त्यातूनही नगण्य उत्पन्न येऊ लागले आहे़ शासनाकडून जिल्हांतर्गत बसेस सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असले तरी मोजक्याच बसेस धावत असल्याने उत्पन्न सध्या तरी नावाला आहे़ एसटीच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून मालवाहतूकीचा प्रयोगही नंदुरबार आगाराने सुरू केला आहे़ मात्र या प्रयोगाला म्हणावे तेवढे यश गेल्या महिन्यात प्राप्त झालेले नसल्याचे एसटीकडे आलेल्या मिळकतीतून पुढे आले आहे़ यामुळे एसटीची आंतरजिल्हा वाहतूक सुरू होणे हा उत्पन्न वाढीचा एकमेव पर्याय असल्याचे अधिकारी आणि कर्मचारी सांगत आहेत़ परंतु या वाहतूकीत कोरोना संसर्गाचा धोका असल्याने सप्टेंबरमध्यापर्यंततरी असा निर्णय होणे शक्य नसल्याची माहिती आहे़१२० बसेस असलेल्या नंदुरबार आगारातून दर दिवशी ६७६ बसफेºया होत होत्या़ यातून दिवसाला ४२ हजार किलोमीटरचा प्रवास बसेसचा होत होता़ यातून दिवसाला १४ लाख रूपये आगाराला मिळत होते़ लॉकडाऊननंतर हे उत्पन्न पूर्णपणे थांबले आहे़ यातून महिन्यात ४ कोटी २० लाख आणि चार महिन्यात १६ कोटी ८० लाख रूपयांचे नुकसान झाले आहे़ हे नुकसान भरून काढण्यासाठी सुरू केलेल्या मालवाहतूकीला अल्प प्रतिसाद मिळून एका महिन्यात केवळ चार लाख उत्पन्न आले़आजघडीस आगारातून मिशन बिगीन अगेन अंतर्गत जिल्हांतर्गत १८ बसफेºया सुरू करण्यात आल्या आहेत़ यातून ५९९ किलोमीटर प्रवास होवून त्यातून मिळणारे उत्पन्न हे हजारांच्या घरात आले आहे़४आगारात यांत्रिकी, चालक, वाहक, लिपिक आणि अधिकारी वर्गीय असा एकूण ५७६ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे़ लॉकडाऊन काळात एसटी बंद असतानाही या सर्व कर्मचाºयांना जून महिन्यापर्यंत नियमित वेतन मिळाले होते़ परंतु जुलै महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नसल्याची माहिती आहे़लॉकडाऊन काळात ११ कर्मचारी हे वयोमनानुसार सेवानिवृत्त झाले असून एकाही कर्मचाºयाने या काळात स्वेच्छानिवृत्ती घेतलेली नसल्याची माहिती आहे़एसटीच्या बसला एक किलोमीटर धावण्यासाठी प्रतिकिलोमीटर ९ रूपये खर्च अपेक्षित आहे़ परंतु सद्यस्थितीत धावणाºया बसेस ह्या प्रतीकिलोमीटर २० रूपयांचा खर्च करत आहेत़ यातून होणाºया १८ बसफेºया नफ्यापेक्षा तोटा देणाºया असल्याची माहिती देण्यात आली आहे़