झाडे जगवणा:या ग्रामस्थांना जाम ग्रा.पं.तर्फे बक्षिसे जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 11:23 IST2019-07-19T11:23:17+5:302019-07-19T11:23:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा : शहादा तालुक्यातील जाम येथे प्राही जनहित फाऊंडेशनतर्फे मोफत आरोग्य तपासणी व वृक्षारोपण कार्यक्रम झाला. ...

Living trees: Announced prizes by Jam Gram Panchayat to these villagers | झाडे जगवणा:या ग्रामस्थांना जाम ग्रा.पं.तर्फे बक्षिसे जाहीर

झाडे जगवणा:या ग्रामस्थांना जाम ग्रा.पं.तर्फे बक्षिसे जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क
बामखेडा : शहादा तालुक्यातील जाम येथे प्राही जनहित फाऊंडेशनतर्फे मोफत आरोग्य तपासणी व वृक्षारोपण कार्यक्रम झाला. वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणा:या ग्रामस्थांना ग्रामपंचायतीतर्फे बक्षिसे जाहीर करण्यात आली.
या वेळी ग्रामस्थांना फाऊंडेशन व ग्रामपंचायतीतर्फे प्रत्येकी एक-एक वृक्ष देण्यात आले. झाड जगविल्यास ग्रामपंचायतीतर्फे बक्षीस देण्यात येईल, असे ग्रामपंचायतीकडून जाहीर करण्यात आले. त्यात दोन झाडे जगविल्यास प्रथम बक्षीस पाच हजार रुपये व एक वर्षासाठी घरपट्टी-पाणीपट्टी सूट, द्वितीय बक्षीस 2100 रुपये व एक वर्षासाठी घरपट्टी-पाणीपट्टी सूट व तृतीय बक्षीस 1100 रुपये व एका वर्षासाठी घरपट्टी-पाणीपट्टी  सूट अशा तीन व्यक्तींना बक्षीस देण्यात येणार आहे. गावात झाडे जगविल्यास प्रत्येक लाभार्थीचे नावे लिहून 10 नावांची लकी ड्रॉ पद्धतीने निवड करून त्यांची एक वर्षाची घरपट्टी पाणीपट्टी सूट करण्यात येईल. कार्यक्रमास अभियंता जेलसिंग पावरा यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमास सिताराम पावरा, शांताराम खर्डे, सरपंच ईश्वर वाघ, ग्रामसेवक हेमंत पाटील, डॉ.हेमंत बच्छाव, प्राही जनहित फाऊंडेशन टीमचे गणेश मोहिते ,प्रदिप चव्हाण, सुनिल सतवे, मणीलाल खर्डे, मनोज ठाकरे, दिवान पावरा, हिंमत पटले व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचलन मुख्याध्यापक तुषार पाटील यांनी तर आभार सुभाष वाघ यांनी मानले.

Web Title: Living trees: Announced prizes by Jam Gram Panchayat to these villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.