शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

मांज्यात गुरफटलेल्या १२७ पक्ष्यांना ‘जीवदान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 13:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरात मकरसंक्रांतीनिमित्त होणाऱ्या पंतगोत्सवात बळी जाणाºया पक्ष्यांचा बचाव करण्यासाठी यंदाही बर्ड कॅम्प लावले जाणार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरात मकरसंक्रांतीनिमित्त होणाऱ्या पंतगोत्सवात बळी जाणाºया पक्ष्यांचा बचाव करण्यासाठी यंदाही बर्ड कॅम्प लावले जाणार आहेत़ या उपक्रमातून गेल्या दोन वर्षात तब्बल १२८ पक्ष्यांचे जीव वाचले असून ३० पक्ष्यांना मात्र जीव गमवावा लागला आहे़ यंदा वनविभागाच्या पुढाकाराने सेवाभावी संघटना पक्ष्यांवर उपचार करण्यासाठी पुढे आल्या आहेत़आकाशात उंच उंच जाणाºया पंतगाचा मांजा लागून पक्ष्यांना अपघात होत असल्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत़ यासाठी वनविभागाच्या सहकार्याने शहरात श्री जैन यंग अलर्ट ग्रुप व श्री ज्ञानहंस गृप अँड महावीर सेना यांच्यावतीने वनविभाग कार्यालयासह दोन ठिकाणी बर्ड कॅम्प अर्थात जीवदया अभियानाचे आयोजन करण्यात येते़ यांतर्गत पंतगाच्या मांज्यात गुरफटून जखमी झालेल्या पक्ष्यांना मोकळे करुन त्यांच्यावर उपचार करण्यात येतात़ आठ वर्षांपासून सुरु असलेल्या या उपक्रमांतर्गत १४ आणि १५ जानेवारी या दोन दिवसात शहरात जखमी पक्ष्यांचा शोध घेऊन त्यांना उपचार दिले जाणार आहेत़ यासाठी वनविभागाचे वनरक्षक यांच्या पथकासह संबधित दोन्ही सेवाभावी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते गस्तीवर राहणार आहे़ वनविभागाने सतर्कता दाखवून हाती घेतलेल्या या मोहिमेंतर्गत पंतगबाजीचा आनंद लुटणाºया उत्साहींची जनजागृती करुन साध्या दोºयाचा वापर करण्याचे सांगितले जाणार आहे़ शहरात मांजा लागून पक्षी जखमी होण्यासोबत नायलॉन मांजाचाही मोठा त्रास आहे़ यासाठी वनविभागाने नियमावली तयार केली असून नायलॉन मांजा विक्री व वापर करणाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले आहेत़४वनविभाग, श्री यंग जैन अलर्ट ग्रुप आणि श्री ज्ञानहंस ग्रुप अँण्ड महावीर सेना यांच्या संयुक्त विद्यमाने २०१८ मध्ये राबवण्यात आलेल्या जीवदया अभियानातून ७८ पक्ष्यांचा बचाव करण्यात आला होता़ तर जखमी झालेले १७ पक्षी मृत झाले होते़४२०१९ मध्ये हीच मोहिम राबवण्यात आली़ यात ४८ पक्ष्यांचा बचाव करण्यात संबधितांना यश आले होते़ परंतू १३ पक्षी मृत झाल्याचे यावेळी ूिदसून आले़ या मोहिमेत पशुसंवर्धन विभागासह मान्यवर पशुवैद्यकांना समाविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे़ त्यानुसार पक्षी बचाव अभियान राबवले जाणार असल्याची माहिती आहे़४नंदुरबार शहरातील उड्डाण पुलाजवळ वनविभागाचे कार्यालय व श्री अजीतनाथ जैन मंदिर जयवंत चौक याठिकाणी हा बर्ड कॅम्प दोन सुरु राहणार आहे़ नागरिकांनी जखमी पक्ष्यांना त्याठिकाणी आणल्यानंतर त्याठिकाणी उपचार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़४गेल्या दोन वर्षात बगळा, कबूतर, घुबड, चिमणी, पोपट, मोर, कोकिळ आणि घार या पक्ष्यांना मांजापासून सुरक्षित करण्यात वनविभागासह दोन्ही संस्थांना यश आले आहे़ वनविभागाने यंदाही या उपक्रमासाठी कर्मचारी नियुक्त करुन पशुसंवर्धन विभागाला पाचारण करुन औषधींची सोय करुन दिली आहे़पतंगबाजीतून पक्ष्यांना होणाºया दुखापतीच्या पार्श्वभूमीवर वनविभागकडून नायलॉन मांजाची विक्री करणारा दुकानदार, विक्रेते यांच्यावर वन्यजीव कायदा १९७२ अन्वये गुन्हे दाखल करणार असल्याचे कळवण्यात आले आहे़नायलॉन मांजा विक्रीवर जिल्हाधिकारी यांनीही आदेश काढून बंदी केली आहे़ असे असतानाही शहरातील अनेक भागात नायलॉन मांजाची विक्री सुरु असल्याचे दिसून आले आहे़ यातून त्याचा वापरही मोठ्या प्रमाणात सुरु आहे़