गावठी दारूसह पावणेदोन लाखांचे साहित्य जप्त

By Admin | Updated: February 3, 2017 00:49 IST2017-02-03T00:49:05+5:302017-02-03T00:49:05+5:30

नवापूर तालुक्यातील बिजगाव येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत 57 हजारांच्या गावठी दारूसह एक लाख 70 हजार रुपयांचे रसायन जप्त करण्यात आले.

The literature of the village darseh pavadon lakh was seized | गावठी दारूसह पावणेदोन लाखांचे साहित्य जप्त

गावठी दारूसह पावणेदोन लाखांचे साहित्य जप्त


नंदुरबार : नवापूर तालुक्यातील बिजगाव येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक आणि विसरवाडी पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत 57 हजारांच्या गावठी दारूसह एक लाख 70 हजार रुपयांचे रसायन जप्त करण्यात आले. विसरवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिजगाव शिवारात मोठय़ा प्रमाणावर गावठी दारू तयार केली जात असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक गिरीश पाटील यांच्या पथकाने विसरवाडी पोलिसांच्या मदतीने गुरुवारी सकाळी बिजगाव शिवारातील नाल्यात धाड टाकली. त्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर गावठी दारू तयार केली जात असल्याचे स्पष्ट झाले. 27 ड्रममध्ये साठविलेली 57 हजार रुपयांची पाच हजार 400 लीटर गावठी दारू जप्त करीत पोलिसांनी एक लाख 70 हजार रुपयांचे     रसायन आणि दारू बनविण्यासाठी लागणारे इतर साहित्यदेखील जप्त केले.
पोलिसांना पाहताच संशयित    त्या ठिकाणाहून फरार झाले.   याबाबत विसरवाडी पोलीस     ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक गिरीश पाटील, विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सपकाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: The literature of the village darseh pavadon lakh was seized