पॉलिशच्या बहाण्याने सव्वा लाखाचे दागिने लंपास

By Admin | Updated: July 8, 2017 13:42 IST2017-07-08T13:42:45+5:302017-07-08T13:42:45+5:30

उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Liquid jewelry worth Rs | पॉलिशच्या बहाण्याने सव्वा लाखाचे दागिने लंपास

पॉलिशच्या बहाण्याने सव्वा लाखाचे दागिने लंपास

 ऑनलाईन लोकमत

 
नंदुरबार, दि.8 - सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करण्याच्या बहाण्याने एकाने महिलेकडून सव्वा लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना शहरातील दादावाडी भागात 7 रोजी रात्री आठ वाजता घडली. उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दादावाडीत प्लॉटनंबर 56 मध्ये राहणा:या रेखा हर्षद देसाई या महिलेकडे एकजण आला. त्याने रेखाबाई यांना दागिने पॉलिश करण्याची पावडर असल्याचे सांगितले. त्यानुसार एका पाऊचमधील पावडर महिलेच्या हातात दिली. ती पावडर डब्यात ठेवून त्यात पाणी व दागीने टाकून गॅसवर ठेवण्यास सांगितले. पाच मिनिटांनी डबा उघडण्यास सांगून तो तेथून निघून गेला. पाच मिनिटांनी रेखाबाई यांनी डबा उघडून पाहिला असता त्यात दागिने नसल्यामुळे आपण फसवले गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. संबधित भामटय़ाने एक लाख 25 हजार रुपये किंमतीच्या पाच तोळ्याच्या चार बांगडय़ा घेवून पोबरा केला. तशी फिर्याद रेखाबाई देसाई यांनी उपनगर पोलिसात दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Liquid jewelry worth Rs