विजेच्या धक्क्याने बैल जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 12:00 IST2019-09-03T12:00:39+5:302019-09-03T12:00:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लहान शहादा : विजेच्या धक्याने बैल जागीच ठार तर दैव बलवत्तर म्हणून शेतक:यासह औताला जुंपलेला दुसरा ...

विजेच्या धक्क्याने बैल जागीच ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
लहान शहादा : विजेच्या धक्याने बैल जागीच ठार तर दैव बलवत्तर म्हणून शेतक:यासह औताला जुंपलेला दुसरा बैल वाचल्याची घटना भागसरी शिवारात घडली. दरम्यान, या घटनेमुळे शेतक:याला जबर मानसिक धक्का बसला आहे.
भागसरी येथील शेतकरी वसंत काशिनाथ पाटील हे धामडोद रस्त्याला लागून असलेल्या त्यांच्या कापूस लागवड केलेल्या शेतात सकाळी कोळपणी करीत होते. शेतातच विजेचा खांब असल्याने त्याला ताण देण्यासाठी तार ओढला आहे. बैलजोडीने कोळपणी करीत असतांना एका बैलाचा स्पर्श त्या तारेला झाला. स्पर्श होताच बैल तडफडू लागला. बैलांना जुंपलेली दुसर ही लाकडी असल्याुमळे दुसरा बैल आणि शेतकरी देखील वाचला. परंतु आपल्या डोळ्यांसमोर बैल तडफडून मेल्याने शेतकरी वसंत पाटील यांना जबर मानसिक धक्का बसला. लगतच्या शेतातील मजूर आणि शेतकरी धावून आल्यानंतर त्यांनी मदत केली.
परिसरात लोंबकळणा:या तारा आणि वीज खांबांना ताण दिलेल्या तारा जिर्ण झाल्या आहेत. त्यामुळे वीज कंपनीने याची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.