जीर्ण झाड कोसळल्याने वीज तारा तुटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 12:45 IST2019-11-24T12:45:43+5:302019-11-24T12:45:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील डामरखेडा गावात शहादा-प्रकाशा रस्त्याच्या कडेला असलेले सुकलेले, जीर्ण झाड वीज तारांवर पडल्याने डीपीजवळील ...

Lightning breaks down due to old tree collapse | जीर्ण झाड कोसळल्याने वीज तारा तुटल्या

जीर्ण झाड कोसळल्याने वीज तारा तुटल्या

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातील डामरखेडा गावात शहादा-प्रकाशा रस्त्याच्या कडेला असलेले सुकलेले, जीर्ण झाड वीज तारांवर पडल्याने डीपीजवळील विजेची तार रस्त्यावर पडल्याने मोठा आवाज झाला. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.
शहादा-प्रकाशा रस्त्यावरील डामरखेडा गावात नांदरखेडा फाटय़ाजवळ सुकलेले झाड अचानक कोसळल्याने मोठा आवाज होऊन भीतीचे वातावरण पसरले होते. झाडाला लागूनच विद्युत डीपी व  वीज तार असल्याने त्यावर झाड कोसळल्याने तारा तोडून पूर्णपणे रस्त्यावर पडले होते. रस्त्याला लागूनच हे जीर्ण झाड होते. सुदैवाने ते रस्त्याच्या पलीकडे पडले, रस्त्यावर पडले असते तर या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणावर वाहतूक सुरू असते. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली असती. ते झाड पडले त्याच्या बाजूलाच नांदरखेडाकडे जाण्यासाठी रस्ता आहे. या रस्त्यावर नेहमी प्रवासी वाहनांची वाट बघत उभे असतात. मात्र झाड व वीज तार खाली पडल्या तेव्हा सुदैवाने तेथे कोणीही नव्हते. पडलेल्या झाडाला गावक:यांच्या मदतीने तोडून वीज तारा मोकळ्या करण्यात आल्या. त्यानंतर वीज वितरण कंपनीच्या कर्मचा:यांची  तारा जोडण्यासाठी कसरत सुरू होती.
 

Web Title: Lightning breaks down due to old tree collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.