‘कोरोना’ला रोखण्यासाठी प्रकाशा येथे उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 01:00 PM2020-03-28T13:00:54+5:302020-03-28T13:01:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रकाशा येथील ग्रामपंचायतीने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. जिल्ह्यात रक्ताची कमतरता ...

Light fixes to prevent 'corona' | ‘कोरोना’ला रोखण्यासाठी प्रकाशा येथे उपाययोजना

‘कोरोना’ला रोखण्यासाठी प्रकाशा येथे उपाययोजना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रकाशा येथील ग्रामपंचायतीने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. जिल्ह्यात रक्ताची कमतरता भासत असल्याने येथे नवजीवन ब्लड बँक व ग्रामस्थांतर्फे घेण्यात आलेल्या शिबिरात ५१ दात्यांनी रक्तदान केले.
प्रकाशा ग्रामपंचायतीतर्फे गावातील किराणा, भाजीपाला, मेडिकल, मांस विक्री दुकानांवर गर्दी होऊ नये यासाठी ग्राहकांमध्ये तीन फुटाचे अंतर राखण्यासाठी चुना टाकून आखून दिले. तसेच ग्रामस्थांना मास्कचे वाटप करण्यात आले. या वेळी सरपंच सुदाम ठाकरे, उपसरपंच भरत पाटील उपस्थित होते. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार सुनील पाडवी, गौतम बोराळे, पंकज जिरेमाळी हे गावात गस्त घालून हटकत आहेत. चौकाचौकात बसलेल्या तरूणांना समज दऊन घरी पाठवत आहेत. जे समजत नाही त्यांना खाकीचा धाक दाखवला जात आहे. मात्र तरीही काही ऐकत नाही तेव्हा त्यांना मार द्यावा लागत आहे.
५१ दात्यांचे रक्तदान
प्रकाशा येथील सद्गुरू तोताराम महाराज मंदिरात चौकात शुक्रवारी नवजीवन ब्लड बँक व प्रकाशा ग्रामस्थांतर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यात रक्तपुरवठा कमी असल्याने नवजीवन ब्लड बँक यांनी रक्तदान करण्यासंदर्भात आवाहन केले होते. त्यानुसार येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यात ५१ तरुणांनी रक्तदान केले. नवजीवन ब्लड बँकेचे डॉ.सुनील पाटील, योगेश पाटील, अक्षय पाटील, चेतन चौधरी यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Web Title: Light fixes to prevent 'corona'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.