कमरेइतक्या पाण्यातून जीवघेणा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 12:45 IST2020-09-06T12:44:55+5:302020-09-06T12:45:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील वेहगी नदीवर पूल नसल्याने बारीपाडा, पाटीलपाडा, आमराईपाडा या पाड्यातील ग्रामस्थांना पावसाळ्यात नदीच्या ...

कमरेइतक्या पाण्यातून जीवघेणा प्रवास
लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील वेहगी नदीवर पूल नसल्याने बारीपाडा, पाटीलपाडा, आमराईपाडा या पाड्यातील ग्रामस्थांना पावसाळ्यात नदीच्या पाण्यातून बाजारासाठी व शासकीय कामासाठी जावे लागते. अचानक पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास मोठी दुर्घटना घडू शकते त्यामुळे या नदीवर पूल बांधण्याची मागणी या पाड्यांवरील नागरिकांनी केली आहे.
सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील वेहगी नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात पुराच्या पाण्यातून बारीपाडा, पाटीलपाडा, आमराईपाडा येथील ग्रामस्थांना बाजारासाठी किंवा शासकीय कामासाठी नदी ओलांडून जावे लागते. पावसाळ्यात सातपड्याच्या अतिदुर्गम भागात पावसाचा जोर जास्त असतो. पहाडात झालेल्या पावसाचा अंदाज येत नाही. त्यामुळे या भागातील नदी-नाले पावसाळ्यात कायम प्रवाहीत असतात. एखाद्यावेळी नदीच्या पाण्यात अचानक वाढ झाली व ग्रामस्थांची ये-जा सुरू राहिली तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या नदीवर पूल बांधण्याची मागणी वारंवार करण्यात आली आहे. परंतु संबंधित विभागाचे व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. पुलाअभावरी या भागातील पावसाळ्यात नागरिकांचे होणारे हाल लक्षात घेऊन तातडीने पूल बांधण्याची मागणी दुर्गम भागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.