खंडीत वीज पुरवठय़ाने जनजीवन ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 11:48 IST2019-06-13T11:48:35+5:302019-06-13T11:48:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वादळ व पावसामुळे अनेक ठिकाणचे विद्युत खांब व तारा तुटल्याने मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेपासून ...

Life-saving jam with disconnected electricity supply | खंडीत वीज पुरवठय़ाने जनजीवन ठप्प

खंडीत वीज पुरवठय़ाने जनजीवन ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वादळ व पावसामुळे अनेक ठिकाणचे विद्युत खांब व तारा तुटल्याने मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेपासून खंडित झालेला वीज पुरवठा बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता सुरळीत झाला. तब्बल 23 तासापेक्षा अधीक काळ काही अपवाद वगळता संपुर्ण शहराचा वीज पुरवठा खंडित होता. यामुळे शहराच्या पाणी पुरवठा ठप्प झाला. अनेक शासकीय कार्यालये, बँकामधील कामकाज देखील प्रभावीत झाले होते. 
दरम्यान, वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचा:यांनी रात्री दोन वाजेपासूनच युद्धपातळीवर दुरूस्तीच्या कामांना वेग दिला होता. परंतु वीज खांब मोठय़ा प्रमाणावर पडल्याने आणि तारा तुटल्याने त्याला वेळ लागला. 
मंगळवारी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास अचानक वादळासह पावसाला सुरुवात झाली. वादळाचा जोर अधीक असल्यामुळे दोंडाईचा ते पातोंडा आणि पातोंडा ते नंदुरबार अशा मुख्य वीज वाहिनीचे अनेक खांब उन्मळून पडले तर अनेक ठिकाणी वीज तारा तुटल्या. यामुळे नंदुरबारातील 80 टक्के भागात 20 तासापेक्षा अधीक काळ वीज पुरवठा खंडित होता. यामुळे जनजिवनावर परिणाम दिसून आला. असह्य उकाडा आणि वाढलेले तापमान यामुळे घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले होते. 
मुख्य वीज वाहिनी प्रभावीत
दोंडाईचा येथील मुख्य वीज केंद्रातून येणारी उच्च दाबाची वीज वाहिनीचे अनेक ठिकाणचे खांब वादळामुळे वाकले होते. काही ठिकाणी खांब उन्मळून पडले. वीज तारांवर वृक्ष कोसळल्याने देखील मोठे नुकसान झाले. परिणामी दोंडाईचा ते पातोंडा वीज केंद्रार्पयत वीज पुरवठा ठप्प झाला. त्याच दरम्यान पातोंडा ते नंदुरबारातील नेहरूनगर वीज केंद्रार्पयतच्या अंतरात देखील मोठय़ा प्रमाणावर वीज खांब कोसळले होते. एवढी मोठी हाणी लक्षात घेता वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचा:यांनी रात्री दोन वाजेपासूनच कामाला सुरुवात केली होती. परिणामी पहाटे तीन वाजता काही भागातील वीज पुरवठा सुरळीत होऊ शकला. परंतु नंतर तो देखील खंडित झाला. 80 टक्के भागातील वीज पुरवठा मात्र बंदच राहिला.
जनजिवनावर परिणाम
23 तासापेक्षा अधीक काळ वीज पुरवठा खंडित राहिल्याने त्याचा परिणाम जनजिवनावर झाला. अनेक भागातील मोबाईल टॉवर बंद झाले होते. परिणामी नेटवर्कला समस्या येत होत्या. मोबाईल चाजिर्ग देखील होऊ न शकल्याने अनेकांचे मोबाईल शोपीस ठरले होते.
शासकीय कार्यालयांमधील इन्व्हर्टरचा बॅक संपल्याने व जनरेटरलाही मर्यादा आल्याने कामकाजावर परिणाम झाला होता. पाणी विक्री करणा:यांचे  फिल्टरेशन प्लॅट देखील वीजेअभावी बंद राहिल्याने अनेक शासकीय कार्यालये, बँका, खाजगी कार्यालये, घरांमध्ये होणारा पाणीपुरवठा होऊ शकला नाही. 
घामाच्या धारांनी हैराण
मंगळवारी रात्रभर आणि बुधवारी दुपार्पयत वीज पुरवठा खंडित राहिल्याने आणि त्यातच वातावरणातील आद्रतेत झालेली वाढ व तापमानाचाही वाढलेला पारा यामुळे घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले होते. घरांमधील इन्व्हर्टरचा बॅकअप संपलेला होता. परिणामी उकाडय़ातच रात्र आणि दिवसही काढावा लागला. यामुळे लहान बालकं आणि वृद्धांना मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागल्याचे चित्र होते. 
रुग्णालयांमध्येही समस्या
खंडित वीज पुरवठय़ाचा परिणाम रुग्णालयांमध्येही झाला. ज्या ठिकाणी जनरेट होते तेथे काही वॉर्ड पुरता वीज पुरवठा करण्यात येत होता काही ठिकाणी तर रुग्णांचे मोठे हाल झाले. जिल्हा रुग्णालयात हे चित्र मोठय़ा प्रमाणावर होते. 
 

Web Title: Life-saving jam with disconnected electricity supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.