चिंचोली येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 13:00 IST2020-04-14T13:00:22+5:302020-04-14T13:00:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : लाभार्थ्यांना कमी धान्य देणे, दुकानात फलक नसणे, धान्य साठ्यात तफावत अशा वेगवेगळ््या कारणांनी जळगाव ...

चिंचोली येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : लाभार्थ्यांना कमी धान्य देणे, दुकानात फलक नसणे, धान्य साठ्यात तफावत अशा वेगवेगळ््या कारणांनी जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी रद्द केला. स्वस्त धान्य दुकानांच्या तक्रारी वाढतच असल्याने सलग तिसºया दिवशी ही कारवाई करण्यात आली असून तीन दिवसात पाच दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे.
चिंचोली येथील संजय शालीग्राम घुगे यांच्या स्वस्त धान्य दुकानाबाबत तक्रारी वाढत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या निर्देशानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी तसेच पुरवठा तपासणी अधिकाºयांनी तपासणी केली. त्या वेळी तेथे आवश्यक ते फलक नसणे, आवश्यक दस्तावेज नसणे, नमुने नसणे शिधापत्रिकेवर धान्य वितरणाची नोंद नाही, ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दराने धान्य वितरण करणे, धान्य साठ्यात तफावत अशा अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे या दुकानाचा परवाना रद्द करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी सूर्यवंशी यांनी दिले.
या दुकानाचे नियतन नजीकच्या स्वस्त धान्य दुकानास जोडण्याचेही आदेश दिले आहे.