शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
2
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
5
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
6
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
7
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
8
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
9
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
10
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
11
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
12
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
13
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
14
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
15
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
16
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
17
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
18
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
19
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
20
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील

तळोद्यातील 67 ग्रामपंचायतींना पत्र : विकास कामांचा मागवला लेखाजोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 1:08 PM

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : येथील महसूल प्रशासनाने अवैध गौणखनिजाच्या वापराकडे आपला मोर्चा वळवला आह़े रोज वाहनांची तपासणी करण्यात येत असून दोषी आढळल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येत आह़े            शिवाय तालुक्यातील 67 ग्रामपंचायतींना                पत्र पाठवून विकास कामांची माहिती तातडीने मागवली ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : येथील महसूल प्रशासनाने अवैध गौणखनिजाच्या वापराकडे आपला मोर्चा वळवला आह़े रोज वाहनांची तपासणी करण्यात येत असून दोषी आढळल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येत आह़े            शिवाय तालुक्यातील 67 ग्रामपंचायतींना                पत्र पाठवून विकास कामांची माहिती तातडीने मागवली आह़ेतळोदा तालुक्यात अवैध गौणखनिजाच्या वाहतूक प्रकरणी येथील वरिष्ठ महसूल प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली तालुका महसूल प्रशासनाने तीव्र मोहिम हाती घेतली आहे. यासाठी ठिकठिकाणी कर्मचा:यांची पथके तयार करुन दोषी आढळणा:या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात आह़े त्यामुळे साहजिकच यातून महसूल विभागाच्या उत्पन्नातही मोठी भर पडत                      आह़े प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे. प्रशासनाने आता या अवैध गौणखनिज प्रकरणी तालुक्यातील ग्रामपंचायतींना लक्ष केले आह़े याचाच दाखला म्हणून, तालुक्यातील 67 ग्रामपंचायतींना तालुका महसूल प्रशासनाकडून नुकतेच पत्र पाठविण्यात आले आह़े ग्रामपंचायतींमार्फत मोठय़ा प्रमाणात विकास कामे सुरु करण्यात येत असताना त्यासाठी लागणा:या गौणखनिजांची रॉयल्टी भरली जात नसल्याचे प्रशासनाला आढळत आह़े त्यामुळे ग्रामपंचायतींमार्फत गेल्या वर्षी व यंदा 14 व्या वित्तआयोग तसेच पेसाअंतर्गत किती कामे झालीत?, सद्या किती कामे सुरु आहेत? या शिवाय घरकुलांच्या कामांची माहिती तातडीने सादर करुन अहवाल पाठवावा असे निर्देश तालुक्यातील ग्रामसेवकांना दिले आह़े याबाबतचे पत्र ‘लोकमत’च्या हाती लागले  आह़े या माहितीसोबतच शासनाच्या वित्तआयोग, पेसा व इतर योजनांतर्गत मिळणा:या निधीतून अंतर्गत रस्ते, गटारी, विविध शाळांची बांधकामे शिवाय घरकुले, शौचालये आदी कामकाजांसाठी मिळणारे अनुदान खर्च केलेला निधी याची स्वतंत्र माहिती मागवली आह़ेसन 2016-2017 व 2017-2018 गौणखनिजसाठी शासनाकडे किती महसूल जमा केला त्याची चलनासह माहिती द्यावी असे आदेशही देण्यात आलेले आह़े त्यामुळे आता ग्रामपंचायतींना आपला सर्व लेखाजोखा सारद करावा लागणार आह़े