बालविवाह मुक्त नंदुरबार करूया; रणरागिणीचा महिलादिनी संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:34 IST2021-03-09T04:34:44+5:302021-03-09T04:34:44+5:30

अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष ॲड. सीमा पद्माकर वळवी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतधिकारी वसुमान पंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी ...

Let's make Nandurbar child marriage free; Ranaragini's Women's Day resolution | बालविवाह मुक्त नंदुरबार करूया; रणरागिणीचा महिलादिनी संकल्प

बालविवाह मुक्त नंदुरबार करूया; रणरागिणीचा महिलादिनी संकल्प

अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष ॲड. सीमा पद्माकर वळवी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतधिकारी वसुमान पंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी ठाकूर, अनुजा महेंद्र पंडित, रूपाली रघुनाथ गावडे उपस्थिती होत्या. जिल्हा परिषद अध्यक्ष ॲड.सीमा वळवी म्हणाल्या की, महिलांनी आपल्या हक्का प्रती जागरूक राहिले पाहिजे. जिल्ह्यात बाल विवाह हा अतिशय गंभीर विषय आहे. याबाबत ठोस पावले उचलली गेली पाहिजे.

प्रांतधिकारी वसुमना पंत यांनी सांगितले की, महिला कुटुंब, नोकरी, मुलांचे संगोपन अशा अनेक भूमिका बजावत आहे. हे फक्त महिलाच करू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी ठाकूर यांनी सांगितले की, महिलांचे प्रश्न आमच्याकडे आले तर आम्ही नक्की मदत करू, असे आश्वासन त्यांनी दिले. कार्यक्रमात सर्व स्तरातील महिला उपस्थित आहे. याचा मला खूप आनंद आहे. रूपाली गावडे, अनुजा महेंद्र पंडित, आनंदीबाई जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदुरबार जिल्हा महिला समुपदेशन केंद्राचे जिल्हा समन्वयक राहुल जगताप यांनी केले. कार्यक्रमासाठी पूर्वीशा बागुल, सुमित्रा वसावे, प्रिया वसावे, मयूर माळी, आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Let's make Nandurbar child marriage free; Ranaragini's Women's Day resolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.