आॅक्सिजन बाबतही जिल्हा स्वयंपुर्ण करू -डॉ.राजेंद्र भारूड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 12:42 IST2020-09-06T12:41:19+5:302020-09-06T12:42:34+5:30
रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोरोनाची खबरदारी व उपाययोजना बाबत नंदुरबार जिल्हा प्रशासन सुरुवातीपासून सुक्ष्म नियोजन करीत असल्याने ...

आॅक्सिजन बाबतही जिल्हा स्वयंपुर्ण करू -डॉ.राजेंद्र भारूड
रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरोनाची खबरदारी व उपाययोजना बाबत नंदुरबार जिल्हा प्रशासन सुरुवातीपासून सुक्ष्म नियोजन करीत असल्याने कमी सुविधांमध्येही रुग्णांसाठी सेवेचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक पातळीवर कोविड तपासणी लॅब सुरू झाल्याने तपासणीचे प्रमाणही वाढले असून रुग्णांची संख्या पूर्वीपेक्षा वाढत आहे. परंतु स्थिती नियंत्रणात असून रुग्णांना अधीक चांगली सेवा देण्यासाठी अनेक नवीन प्रस्ताव तयार केले आहेत. त्यातील महत्वाचा घटक म्हणजे आॅक्सीजनचे जनरेशन. प्रयोगशाळा प्रमाणेच आॅक्सीजनबाबतही जिल्हा स्वयंपुर्ण करण्याचे निश्चित केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेद्र भारूड यांनी दिली.
रुग्णांसाठी आॅक्सिजनची अवस्था सद्या काय आहे?
जिल्ह्यात सद्या दिडशे रुग्णांना आॅक्सिजन बेड मिळू शकेल अशी सुविधा आहे. पण पुढील काळात जर रुग्ण वाढले तर रुग्णांना चांगली सेवा देता यावी व आॅक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी नवीन प्रस्ताव आपण तयार केले आहेत. सद्या धुळे आणि जळगाव येथून आॅक्सिजनचे सिलिंडर मागविण्यात येत आहे. अर्थातच सिलिंडरसाठीचा प्रवास व दुसऱ्या जिल्ह्यावर अवलंबून राहणे या बाबी एखाद्या वेळी अडचणीच्याही ठरू शकतात. वेळेवर रुग्णांना आॅक्सिजन देता यावा व त्याची व्यापकता वाढावी यासाठी जिल्ह्यातच स्वतंत्र आॅक्सिजन जनरेशनची व्यवस्था आम्ही करीत आहोत. त्याचा प्रस्ताव तयार असून लवकरच मंजुरी मिळून कामाला सुरुवात होईल. साधारणत: २० ते २५ दिवसाचा कालावधी त्यासाठी लागण्याची शक्यता आहे. पण ते आवश्यक आहे. प्रयोगशाळा नसल्याने स्वॅब तपासणीसाठी धुळे व इतर ठिकाणी पाठवावे लागत होते. त्यामुळे अहवाल मिळायला काही किोविड सेटरमधील रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी संबधीतांना सुचना देण्यात आली आहे. जर रुग्णांच्या सेवेत कुणी कुचराई केल्यास त्याबाबतही कारवाई केली जाईल. शहाद्यातील मोहिदा केद्रावर काही अडचणी होत्या त्या दूर केल्या आहेत. सर्व रुग्णांना प्रशासनातर्फे आवश्यक ती सेवा दिली जात आहे. दवसांचा अवधी जात होता. तो प्रश्न सोडविण्यासाठी आपण जिल्ह्यातच अत्याधुनिक लॅब उभी केल्याने आता तात्काळ अहवाल मिळत आहे. जिल्ह्यात रुग्णांची संख्या तीन हजारापर्यंत गेली आहे. परंतु बरे होण्याचे प्रमाणही वाढले असून जवळपास साडे अठराशेपेक्षा अधीक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण बºयापैकी आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. पण सर्वांनी नियम पाळून जागृत राहणे आवश्यक आहे. स्वॅब तपासणीचे प्रमाणही वाढविले आहे. आतापर्यंत जवळपास ११ हजार जणांचे स्वॅब तपासले आहेत. नंदुरबार तालुक्यात सर्वाधिक पाच हजार १६७ व शहादा तालुक्यातील ३,२५६ जणांचे स्वॅब तपासले.