नवलपूर आश्रमशाळेपासून 500 मीटर अंतरात फिरत होता बिबटय़ा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 11:47 IST2019-03-31T11:47:17+5:302019-03-31T11:47:45+5:30
विद्याथ्र्यामध्ये भिती : शहादा-धडगाव रस्त्यावर संचार

नवलपूर आश्रमशाळेपासून 500 मीटर अंतरात फिरत होता बिबटय़ा
नंदुरबार : तालुक्यातील नवलपूर शिवारात बिबटय़ाचा संचार असून येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळा परिसरात त्याचा संचार असल्याची माहिती देण्यात आली आह़े मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास बिबटय़ा आश्रमशाळेपासून 500 मीटर अंतरातील शेतात दिसून आल्याने शेतक:यांची पळापळ झाली होती़
दरा फाटय़ापासून काही अंतरावर नवलपुर हे आदिवासी लोकवस्तीचे गाव आह़े गावाच्या पूर्वेस शासकीय आश्रमशाळा असून लगतच सुसरी जलप्रकल्प आह़े यापरिसरात गेल्या महिनाभरापासून बिबटय़ाचा संचार असल्याची माहिती देण्यात येत आह़े गावातील पाडळदा रस्त्यावर बिबटय़ा दिसून आल्याची माहिती ग्रामस्थांनी यापूर्वी दिली होती़ दरम्यान मंगळवारी नवलपूर शिवारातील रात्री मोहन तांबोळी यांच्या शेतालगत मजूरांना बिबटय़ा दिसून आला होता़ या परिसरात हाव्रेस्टरच्या सहाय्याने गहू आणि हरभरा काढणी सुरु असल्याने मजूरांची उपस्थिती होती़
बिबटय़ा दिसून आल्यानंतर मजूर आणि शेतक:यांनी थेट गावाकडे पळ काढला़ हे शेत आश्रमशाळेपासून 500 मीटर अंतरावर आह़े यावेळी विद्यार्थी जेवण आटोपून आश्रमशाळा आणि शहादा-धडगाव रस्त्यालगत खेळत असल्याचे प्रत्यक्षदर्शीना दिसून आल़े त्यांनी बिबटय़ा फिरत असल्याची माहिती दिल्यानंतर विद्यार्थी आपपल्या खोल्यांमध्ये गेल़े यावेळी शेतकरी जगदीश पाटील व त्यांचे सहका:यांना आवगे-जुनवणे गावालगत पुन्हा बिबटय़ा दिसून आला़ होता़ सुसरी प्रकल्पात पाणी असल्याने बिबटय़ाचा या भागात संचार वाढल्याचा अंदाज आह़े