विधानसभा निवडणुकीची आजपासून रणधुमाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 12:24 IST2019-09-27T12:24:49+5:302019-09-27T12:24:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील नंदुरबारसह अक्कलकुवा, नवापूर, शहादा विधानसभा मतदारसंघासाठी शुक्रवार, 27 सप्टेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात ...

Legislative assembly elections from today | विधानसभा निवडणुकीची आजपासून रणधुमाळी

विधानसभा निवडणुकीची आजपासून रणधुमाळी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील नंदुरबारसह अक्कलकुवा, नवापूर, शहादा विधानसभा मतदारसंघासाठी शुक्रवार, 27 सप्टेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. यासाठी चारही मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय सज्ज ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यातील चारही मतदार संघ हे एस.टी.प्रवर्गासाठी राखीव आहेत. दरम्यान, चारही मतदार संघात काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, वंचीत आघाडी सक्रीय झाले आहेत. 
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शुक्रवार, 27 पासून सुरू होत आहे. निवडणुकीची अधिसुचना प्रसिद्ध होताच उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. चारही ठिकाणी तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय सज्ज करण्यात आले आहे. शुक्रवार व शनिवार नंतर रविवारी सुट्टी राहील. सोमवार मंगळवार त्यानंतर बुधवारी म.गांधी जयंती दिनाची सुट्टी राहणार आहे. पुन्हा गुरुवार व शुक्रवार ेहे दोन दिवस अर्ज भरण्याचे राहणार आहे. याच दिवशी अर्ज विक्री देखील होणार आहे. 
अर्ज भरण्यास जाणा:यांना पूर्व परवाणगीने रॅली काढता येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात अर्ज दाखल करण्यास जातांना मात्र केवळ पाच जणांनाच परवाणगी राहणार आहे. अर्जा सोबत शपथपत्र आणि आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करणे आवश्यक राहणार आहे. 
निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात व परिसरात आवश्यक तो पोलीस बंदोबस्त देखील तैणात करण्यात येणार आहे. 
नंदुरबार जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघात एकुण 12,24, 429 मतदार मतदान करणार आहेत. त्यात 6,12,389 पुरुष तर 6,12,27 महिला मतदार आणि 13 तृतीय पंथी मतदार आहेत. 398 सैनिक मतदार असून त्यात 389 पुरुष तर नऊ महिला मतदार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी यांना सहायक म्हणून दोन सहायक निवडणूक अधिकारी देखील राहणार आहेत. सर्वच ठिकाणी स्थानिक तहसीलदार तसेच पालिकेचे मुख्याधिकारी असतील. पालिकेचे मुख्याधिकारीपद रिक्त असल्यास गटविकास अधिकारी हे सहायक राहणार आहेत. 
राजकीय पक्ष सज्ज
निवडणुकीसाठी राजकीय पक्ष देखील सज्ज झाले आहेत. अद्याप कुठल्याही पक्षाने उमेदवारी यादी जाहीर केलेली नसली तरी इच्छूक उमेदवार तयारीत आहेत. काँग्रेस चारही ठिकाणी उमेदवार उभे करणार आहे. तर भाजप-सेना युतीचे काय ठरते त्यावर दोन्ही पक्ष आपले उमेदवार देणार आहेत. राष्ट्रवादीला जिल्ह्यात एकही जागा सुटणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी पक्ष सोडण्याचा  निर्णय यापूर्वीच जाहीर केला आहे. वंचीत आघाडीने देखील चारही ठिकाणी उमेदवार देणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. यामुळे या निवडणुकीत देखील बहुरंगी लढती राहण्याची शक्यता आतार्पयतच्या एकुण राजकीय चित्रावरून दिसून येते. 

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ
27 रोजी निवडणुकीची अधिसुचना प्रसिद्ध झाल्यापासून अर्ज दाखल करता येतील. सार्वजनिक सुट्टी वगळता सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेर्पयत अर्ज दाखल करण्याची वेळ राहणार आहे. 27, 28 रोजी श्राद्ध पक्ष आहे. 29 रोजी रविवारची सुटी असेल. 2 ऑक्टोबर रोजी म.गांधी यांच्या जयंतीची सुट्टी राहणार आहे. त्यामुळे श्राद्ध पक्षानंतर चारच दिवस अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना मिळणार आहे. 
 

Web Title: Legislative assembly elections from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.