वीज पोहोचल्याने पाडे झाली प्रकाशमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 12:05 IST2019-06-09T12:05:43+5:302019-06-09T12:05:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील कन्साई ग्रुपग्रामपंचायत हद्दीत असणा:या दुर्गम भागातील मालपूरवाडा, सातपिंप्रीपाडा, मिठापूरपाडा, मेंढय़ावडपाडा, रतनपूरपाडा, निबंडीपाडा, अंबापाणीपाडा, ...

वीज पोहोचल्याने पाडे झाली प्रकाशमान
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातील कन्साई ग्रुपग्रामपंचायत हद्दीत असणा:या दुर्गम भागातील मालपूरवाडा, सातपिंप्रीपाडा, मिठापूरपाडा, मेंढय़ावडपाडा, रतनपूरपाडा, निबंडीपाडा, अंबापाणीपाडा, केवडीपाणीपाडा, धजापाणीपाडा ही गावे वीजपुरवठय़ापासून वंचित होती. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठपुराव्यामुळे ही पाडे प्रकाशमान झाली आहेत.
याबाबत मनसेचे जिल्हा सचिव मनलेश जायसवाल यांनी 24 फेब्रुवारी 2014 ला कार्यकारी अभियंत्यांना ग्रामस्थांसह मोर्चाद्वारे निवेदन दिले होते. त्यानुसार ऑगस्ट 2016 ला विद्युतीकरण कामास मंज़ुरी मिळाली व प्रत्यक्ष कामास प्रारंभ झाला. यात मिठापूर, सातपिप्री, मालपूर, डेम:यापाडा, मेठय़ावडपाडा, रतनपाडा, अंबापाणी, केवडीपाणी, गावात एक कोटी 18 लाख रुपये खचरून मेन लाईनचे 131 खांब उभे केले गेले. एल.टी. लोकल लाईनचे 283 खांब 63 केव्हीचे आठ ट्रान्सफार्मर बसविण्यात आले. 284 घरगुती वीज कनेक्शन घेण्यात आले.
2018-19 या वर्षात उर्वरित धोजापाडा, केवडीपाणीपाडा, हुतालपाडा, अंबापाणीपाडा, पिप्रीपाडा, बारीपाडा, जुनीलिंबर्डी, सुसत्याबारीपाडा या पाडय़ांमध्ये एक कोटी 60 लाखांचे विद्युतीकरण मेनलाईनचे 64 खांब, लोक लाईनचे 366 खांब उभे केले गेले आहे. 25 केव्हीचे चार ट्रान्सफार्मर जुनी लिबर्डी, डेमचापाडा येथे 25 केव्हीचे एक ट्रान्सफार्मर व 25 खांब उभे केले गेले आहे. वरील सर्व पाडय़ांवर 100 टक्के विद्युतीकरण झाले आहे. या पाडय़ांवर 291 घरगुती वीज कनेक्शन घेतले गेले आहे. या 10 ही पाडे व त्याअंतर्गत येणारी सर्व पाडय़ांमध्ये 100 टक्के वीज पोहोचलेली आहे.
यासाठी अनेकदा अधिका:यांना भेटून विद्युतीकरणासाठी पाठपुरावाही करण्यात आल्यामुळेच 100 टक्के विद्युतीकरण झाले. विद्युतीकरणामुळे विद्यार्थी, शेतमजूर व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. दळणवळणासाठी 10 किलोमीटर पायपीट करावी लागत होती. आता गावातच चक्की आल्यामुळे दळणाची सुविधाही उपलब्ध झाली आहे.
यासाठी गावातील फत्तेसिंग भिल, केसूराम पटले, संबीबाई वळवी, ज्योतीबाई तडवी, निवास वळवी यांच्यासह मनसेचे तालुकाध्यक्ष मदन पावरा, पेंटर गोसा, किरण खर्डे यांनी परिश्रम घेतले.