‘एलईडी’ने लख्ख उजळले नंदुरबारातील महादेव नगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 13:22 IST2018-02-22T13:22:48+5:302018-02-22T13:22:53+5:30

'LED' brightly lit Mahadeo Nagar in Nandurbar | ‘एलईडी’ने लख्ख उजळले नंदुरबारातील महादेव नगर

‘एलईडी’ने लख्ख उजळले नंदुरबारातील महादेव नगर

ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि़ 22 : नंदुरबार शहरालगत असलेल्या होळतर्फे हवेली परिसरातील महादेव नगर सध्या ‘एलईडी’ लाईटने लख्ख उजळत आह़े या ठिकाणी ग्रामपंचायतीकडून एलईडी लाईट बसविण्याचे काम सुरु आह़े परंतु अजूनही बहुतेक ठिकाणी हे एलईडी लाईट बसविण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात येत आह़े
गेल्या काही दिवसांपासून या परिसरात दुचाकी चोरी तसेच भुरटय़ा चो:यांच्या घटनांमध्ये वाढ झाली होती़ परिसरात अंधार राहत असल्याने चोरटे याचा फायदा घेत चोरीचे सत्र सुरु ठेवत होत़े गेल्या दोन महिन्यातच येथून आठ ते दहा दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत़ त्या शिवाय परिसरात भुरटया चो:याही दिवसेंदिवस वाढत आह़े त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाकडून हे सर्व लक्षात घेता परिसरात पथदिवे बसविण्याचे स्त्युत्य काम हाती घेण्यात आले आह़े
 

Web Title: 'LED' brightly lit Mahadeo Nagar in Nandurbar