महिला महाविद्यालयात व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:31 IST2021-03-10T04:31:17+5:302021-03-10T04:31:17+5:30
या वेळी सॅनेटाईजर व मास्क वाटप करण्यात आले. तसेच आशांकुर नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले. अध्यक्षस्थानी सोनामाई ...

महिला महाविद्यालयात व्याख्यान
या वेळी सॅनेटाईजर व मास्क वाटप करण्यात आले. तसेच आशांकुर नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले. अध्यक्षस्थानी सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव वर्षा जाधव तर प्रमुख अतिथी म्हणून शारदा कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस. झेड. सैयद, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.भारत चाळसे उपस्थित होते. संस्थेतील महिला शिक्षिका, कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, सोनामाई जाधव यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. प्रा.बी.आर. राजपूत यांचे ‘आजच्या काळापासून ते आधुनिक काळापर्यंत महिलांची वाटचाल ’ या विषयावर व्याख्यान झाले. वर्षा जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ.भारत चाळसे यांनी तर सूत्रसंचालन प्रा.अनिल साळुंके यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रा.पी.पी. डांगे, प्रा.ए.एम. पाटील, प्रा.ए.बी. अहिरे, सुधाकर नाईक, राजेश राठोड, गोकूळ महाजन, उत्तम कुंभार, शोभा गुरव, कैलास सोलंकी, जयपाल गिरासे, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.