विश्रामकाका शैक्षणिक संकुलात अवयवदान दिनानिमित्त व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:31 IST2021-08-15T04:31:27+5:302021-08-15T04:31:27+5:30
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सोपान बोराटे होते. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. क्षितीज गर्गे व श्रीराम दाऊतखाने उपस्थित होते. डॉ. गर्गे ...

विश्रामकाका शैक्षणिक संकुलात अवयवदान दिनानिमित्त व्याख्यान
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सोपान बोराटे होते. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. क्षितीज गर्गे व श्रीराम दाऊतखाने उपस्थित होते. डॉ. गर्गे म्हणाले की, प्रत्येक नागरिकाने माझे शरीर राष्ट्रासाठी आहे, असे मनापासून स्वीकारले पाहिजे. अवयवदान जिवंतपणी व मृत्यूनंतर अशा दोन टप्प्यांत केले जाऊ शकते, अशी माहिती देत ‘मरावे परी अवयव दानरूपी उरावे’ असा संदेश दिला. दाऊतखाने यांनीही ‘अवयव दान आणि अंधश्रद्धा’ या विषयावर मार्गदर्शन केले. महाविद्यालय विकास समितीच्या सदस्या प्रीती अभिजित पाटील यांच्या उपस्थितीत शहादा शहरातील अवयव दात्यांच्या सन्मानार्थ कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात खिलोसिया कुटुंबातील भरतकुमार छोटूभाई खिलोसिया व छाजेड कुटुंबातील लक्ष्मीकांत दीपचंद छाजेड यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे नेत्रदान करून समाजात एक आदर्श निर्माण केला. त्याबद्दल रचना भरतकुमार खिलोसिया, हेताली भरतकुमार खिलोसिया, नीलेश लक्ष्मीकांत छाजेड व ज्योती नीलेश छाजेड यांचा महाविद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला. प्रीती पाटील यांनी दानाचे महत्त्व सांगत पुराणातील कर्णाचा दाखला दिला. यावेळी नीलेश छाजेड व हेताली खिलोसिया यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास नगरसेवक उमेश पाटील, प्राचार्य डॉ. शांताराम बडगुजर, आयएमआरडीचे संचालक प्रा. अनिल पाटील, प्रभारी प्राचार्य डॉ. कैलास चव्हाण, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रम अधिकारी प्रा. सोनाली पाटील, प्रा. इरफान पठाण, प्रा. योगेश भुसारे व प्रा. मंगला पाटील यांनी केले. प्रा. खेमराज पाटील यांनी सूत्रसंचालन केले.