मराठी राजभाषा दिनानिमित्त व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:35 IST2021-03-01T04:35:36+5:302021-03-01T04:35:36+5:30
प्रास्ताविक डॉ. शशिकला पवार यांनी केले. परिचय प्रा.प्रशांत बागुल यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा.डॉ.उमेश शिंदे यांनी केले. कोरोना काळ ...

मराठी राजभाषा दिनानिमित्त व्याख्यान
प्रास्ताविक डॉ. शशिकला पवार यांनी केले. परिचय प्रा.प्रशांत बागुल यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा.डॉ.उमेश शिंदे यांनी केले. कोरोना काळ असल्याने गुगल मीट ॲपवर ऑनलाइन कार्यक्रम झाला. कार्यक्रमासाठी प्रा.डॉ. उमेश शिंदे, महेंद्र पाटील, पंकज गिरासे यांनी परिश्रम घेतले.
महात्मा फुले हायस्कूल, नंदुरबार
नंदुरबार शहरातील महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूलमध्ये मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.ए. मंगळेतर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक आय.डी. पावरा, वसतिगृहाचे अधीक्षक कैलास घोडसे उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. या वेळी प्रमुख वक्ते एस.एस.धनगर यांनी मराठी राजभाषा विषयी सविस्तर माहिती दिली. तसेच एम.एस. म्हसावदकर यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाविषयी सखोल मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डी.बी. पावरा तर आभार पी.एस. पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
अँग्लो उर्दू अध्यापक विद्यालय, नंदुरबार
नंदुरबार - शहरातील अँग्लो ऊर्दू अध्यापक विद्यालयात मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. या वेळी प्राचार्य मेहमूद खाटीक यांनी मराठी भाषेचे महत्त्व या विषयावर सखोल व अभ्यासपूर्ण माहिती दिली. कार्यक्रमासाठी छात्रअध्यापिका आयेशा खाटीक, तहुरा मणियार, जिनिरा खान, नाजमीन शेख, आस्मा मणियार, ईकरा मेमन, फातेमा शेख, सबा इनामदार, जररीन इनामदार, ईकरा मिर्झा, आस्मा शेख यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा.तररनूम शेख तर आभार प्रा.निशात शेख यांनी मानले.