महिला दिनानिमित्त महिलांना होणाऱ्या कॅन्सरबाबत डॉ राजेश पाटील यांचे व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:34 IST2021-03-09T04:34:31+5:302021-03-09T04:34:31+5:30
अध्यक्षस्थानी अंनिसचे जिल्हा पदाधिकारी डॉ.बी.डी. पटेल, समाजसेविका सुनीता पटेल, व्याख्याते डॉ.राजेश पटेल, जायंट्सचे अध्यक्ष भूषण बाविस्कर, संस्थेचे सचिव ॲड.राजेश ...

महिला दिनानिमित्त महिलांना होणाऱ्या कॅन्सरबाबत डॉ राजेश पाटील यांचे व्याख्यान
अध्यक्षस्थानी अंनिसचे जिल्हा पदाधिकारी डॉ.बी.डी. पटेल, समाजसेविका सुनीता पटेल, व्याख्याते डॉ.राजेश पटेल, जायंट्सचे अध्यक्ष भूषण बाविस्कर, संस्थेचे सचिव ॲड.राजेश कुलकर्णी, ॲड.स्मिता जैन, प्रविणा कुलकर्णी, दीपाली बाविस्कर, संगीता पाटील, विनायक साळवे, मुख्याध्यापिका ताराबाई बेलदार, मुख्याध्यापिका मायाबाई जोहरी, प्राचार्या नयना पाटील, सुनीता पाटील, प्रतिभा बोरसे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी महिलांना मार्गदर्शन करताना डॉ.राजेश पाटील म्हणाले की, महिलांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळून येणाऱ्या गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग व गर्भाशयाचा कर्करोग यांचे प्रमाण जास्त असते. गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोगाचे निदान करण्यासाठी पेप टेस्ट व एचपीवी टेस्ट करणे आवश्यक आहे. तसेच कर्करोगापासून बचावासाठी नऊ ते २६ वर्षाच्या आतील मुलींनी, महिलांनी एचपीवी लस घेणे आवश्यक आहे. स्तनाचा कर्करोगापासून बचावासाठी ४० वर्षाच्या पुढील महिलांनी दरवर्षी किंवा दोन वर्षांनी मॅमोग्राफी करणे आवश्यक आहे. तसेच स्तनांचे स्वतः परीक्षण करणे आवश्यक आहे. बी.आर.सी. ए एक व बी.आर.सी. ए दोन टेस्ट करणेदेखील आवश्यक आहे. त्यासोबतच संतुलित आहार, व्यायाम आदी गोष्टी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
अनेक स्त्रियांना स्तनांमध्ये काहीतरी बदल झाल्याचे जाणवते. मात्र ते लाजे पाई डॉक्टरांकडे निदान करण्यासाठी जात नाहीत. मात्र तो कॅन्सर वाढल्यावर अधिक त्रास जाणवू लागल्यावर निदानासाठी जातात. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. म्हणून कोणतीही लाज न बाळगता असा काही त्रास झाल्यास लवकर निदान केल्यास निश्चितच फायदा होऊ शकतो.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येथील व्हॉलंटरी शाळेच्या सभागृहात महिलांसाठी त्यांना होणारा कॅन्सर व तो होऊ नये त्यासाठी कोणती काळजी घ्यावी या विषयावर व्याख्यानाचे आयोजक करण्यात आले होते. अनेकांना याविषयी माहिती नसते. महिलांना माहिती व्हावी व त्यांना कॅन्सरपासून बचाव करता यावा या उद्देशाने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रास्तविक सुनीता पाटील, नम्रता पाटील यांनी केले. सूत्रसंचालन संध्या विसपुते तर आभार ललिता राठोड यांनी मानले. कार्यक्रमासाठी व्हॉलंटरी शैक्षणिक संकुल, लाडकोरबाई शैक्षणिक संकुल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जायंट्स ग्रुप शहादा व पदाधिकारी, शिक्षिका व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.