नंदुरबार येथे ब्रह्मकुमारी सेवा केंद्रात व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:28 IST2021-07-26T04:28:06+5:302021-07-26T04:28:06+5:30
शहरातील जयचंद नगरातील ब्रह्मकुमारी सेवा केंद्रात स्व.विठ्ठल हिरणवाळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे डॉ.सोमनाथ वडनेरे ...

नंदुरबार येथे ब्रह्मकुमारी सेवा केंद्रात व्याख्यान
शहरातील जयचंद नगरातील ब्रह्मकुमारी सेवा केंद्रात स्व.विठ्ठल हिरणवाळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे डॉ.सोमनाथ वडनेरे यांचे व्याख्यान झाले. प्रा.वडनेरे म्हणाले की, समाजात आज सर्वत्र नकारात्मकता वाढीस लागली असताना, वृत्तांकन करताना एका समुपदेशकाची भूमिका निभविणे गरजेचे आहे. त्यासाठी आजच्या वर्तमानपत्रांनी भविष्यपत्रे बनून समाजमन सशक्त बनविण्यासाठी, तसेच भविष्यातील सुदृढ, निरोगी, निर्भय, व्यसनमुक्त आणि मूल्यनिष्ठ समाज निर्मितीसाठी वृत्तांकन करणे आवश्यक आहे, असे सांगितले. प्रास्ताविक मीडिया प्रभागाचे जिल्हा समन्वयक महादू हिरणवाळे यांनी केले. उपस्थितांचे स्वागत बी.के. विजयादीदी यांनी तर अध्यक्षीय संबोधन बी.के. विद्यादीदी (शहादा) यांनी केले. सूत्रसंचलन बी.के. योगीता बहन यांनी केले. कार्यक्रमास बी.के. कल्पनादीदी यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले.