नंदुरबार व शहादा तालुक्यातील ७६ गावांच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:10 IST2021-02-05T08:10:04+5:302021-02-05T08:10:04+5:30
नंदुरबार : पेसा क्षेत्राबाहेरील नंदुरबार व शहादा तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंचपदांचे आरक्षण शुक्रवारी सोडत पद्धतीने काढण्यात आले. नंदुरबार तालुक्यातील ४१ ...

नंदुरबार व शहादा तालुक्यातील ७६ गावांच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत
नंदुरबार : पेसा क्षेत्राबाहेरील नंदुरबार व शहादा तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंचपदांचे आरक्षण शुक्रवारी सोडत पद्धतीने काढण्यात आले. नंदुरबार तालुक्यातील ४१ तर शहादा तालुक्यातील ३५ अशा ७६ ग्रामपंचायतींची सोडत काढण्यात आली. दरम्यान, नंदुरबार तालुक्यातील न्याहली ही ग्रामपंचायत एस.टी. प्रवर्गासाठी तर जूनमोहिदा ही एस.सी.प्रवर्गासाठी राहणार आहे. तर शहादा तालुक्यातील पुसनद ही एस.टी. तर टेंभे ता.शहादा व कुढावद तर्फे सारंगखेडा या ग्रामपंचायती एस.सी. प्रवर्गासाठी राखीव राहतील.
२०२० ते २०२५ या दरम्यानच्या कालावधीतील हे आरक्षण राहणार आहे.
नंदुरबार तालुका
नंदुरबार तालुक्यातील पेसा क्षेत्राबाहेरील ४१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणासाठी शुक्रवार, २९ रोजी सकाळी तहसील कार्यालयात सोडत काढण्यात आली. सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी वसुमना पंत, तहसीलदार भाऊसाहेब थोरात उपस्थित होते. ४१ पैकी दोन ग्रामपंचायती या एस.सी. व एस.टी. प्रवर्गासाठी आहेत. उर्वरित ग्रामपंचायती या खुला व नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव असतील. खुला प्रवर्गासाठी २८ तर ११ ग्रामपंचायती या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी असतील. यावेळी तालुक्यातील राजकीय पदाधिकारी व त्या त्या ग्रामपंचायतींचे प्रतिनिधी उपस्थित होेते. या ग्रामपंचायतींमधून महिला राखीव ग्रामपंचायतींची सोडत ४ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
शहादा तालुक्यात ३५
तालुक्यातील बिगर आदिवासी क्षेत्रातील ३५ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत २९ डिसेंबर रोजी सकाळी मोहिदा रोड येथील नवीन तहसील कार्यालय प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात काढण्यात आली.
३५ ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जातीसाठी एक, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी दोन, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी दहा व सर्वसाधारण प्रवर्गासाठी २२ ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षित करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.
सरपंचपद वेगवेगळ्या प्रवर्गासाठी पाच वर्षाकरिता (एप्रिल २०२० ते मार्च २०२५) गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी आरक्षित करून संख्या निश्चित करण्यात आली आहे.
नंदुरबार तालुक्यातील आरक्षण सोडत...
n एस.टी. प्रवर्गासाठी राखीव : न्याहली
n एस.सी. प्रवर्गासाठी राखीव : जुनमोहिदा
n खुला प्रवर्गासाठी राखीव : हाटमोहिदा, बोराळे, सातुर्खे, ओसर्ली, तिसी, होळतर्फे रनाळा, समशेरपूर, कानळदे, नाशिंदे, आराळे, कार्ली, निंभेल, काकर्दा, विखरण, बलवंड, बह्याणे, सैताणे, कलमाडी, रजाळे, कंढ्रे, सिंदगव्हाण, भालेर, रनाळे, मांजरे, खोंडामळी, शनिमांडळ, तलवाडे खुर्द, आसाणे.
n नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव : तलवाडे बुद्रूक, अमळथे, कोपर्ली, तिलाली, बलदाणे, भादवड, नगाव, खोक्राळे, वैंदाणे, घोटाणे, खर्देखुर्द.
शहादा तालुक्यातील आरक्षण सोडत...
n एस.टी. प्रवर्गासाठी राखीव : पुसनद.
n एस.सी. प्रवर्गासाठी राखीव : टेंभे तर्फे शहादा, कुढावद तर्फे सारंगखेडा.
n खुला प्रवर्गासाठी राखीव : अनरद , कळंबू , कानडी तर्फे शहादा, कुकावल, खैरवे / भडगाव, टेंभे तर्फे सारंगखेडा, तोरखेडा, देऊर / कमखेडा, पळासवाडा, फेस, बामखेडा तर्फे तऱ्हाडी, बिलाडी तर्फे सारंगखेडा, मनरद, मोहिदे तर्फे शहादा, लांबोळा, वरुळ तर्फे शहादा, वर्ढे तर्फे शहादा, शेल्टी, सारंगखेडा, सावळदा, हिंगणी, कोठली तर्फे सारंगखेडा.
n नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव : कौठळ तर्फे सारंगखेडा, सोनवद तर्फे शहादा, बामखेडा तर्फे सारंगखेडा, करजई, डामरखेडा, ससदे, दोंदवाडे, शिरुडदिगर, पुरुषोत्तम नगर, नांदरखेडा.