तोरणमाळ येथे दरीत वाहन कोसळल्याने भीषण अपघात, आठ जण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 07:38 PM2021-07-18T19:38:12+5:302021-07-18T19:38:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी ता. शहादा  : धडगाव तालुक्यातील तोरणमाळ परिसरातील सातपुड्याच्या अतिदुर्गम भाग असलेल्‍या सिंदिदिगर घाटात प्रवासी वाहतुक ...

At least eight people were killed on the spot when a vehicle crashed into a ravine in Toranmal | तोरणमाळ येथे दरीत वाहन कोसळल्याने भीषण अपघात, आठ जण जागीच ठार

तोरणमाळ येथे दरीत वाहन कोसळल्याने भीषण अपघात, आठ जण जागीच ठार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी ता. शहादा  : धडगाव तालुक्यातील तोरणमाळ परिसरातील सातपुड्याच्या अतिदुर्गम भाग असलेल्‍या सिंदिदिगर घाटात प्रवासी वाहतुक करणारी खाजगी क्रुजर गाडी सुमारे ४००  फूट दरीत कोसळुन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून १० पेक्षा अधिक  प्रवासी जखमी झाल्याची माहीत आहे.    
रविवारी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.  तोरणमाळ येथून  खडकी- सिंदिदीगर मार्गाने सातपुड्याच्या दुर्गम भागातील घाटरस्त्यांवरुन मध्यप्रदेशातील सेम्लेट, चेरवी ता.पाटी जि.बडवानी येथे हे प्रवासी वाहन जात होते. प्रवाशांना घेवून जाणारे हे वाहन पाऊस आणि दाट धुके यामुळे दरीत कोसळल्याची माहिती आहे. धुक्यामुळे चालकाला समोरील दृश्य न दिसल्याने घाटातून वाहन थेट ४०० फूट खोल दरीत कोसळल्यानंतर आती आठ जण जागी ठार झाले. दरीत जागोजागी वाहनाचे अवशेष तसेच मृतदेह पडून असल्याचे दिसून येत आहे.  जानेवारी महिन्यात तोरणमाळ ते खडकी दरम्यान असाच भीषण अपघात झाला होता. त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या या अपघाताने या भागातील वाहतूकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान सातपुड्याच्या अती दुर्गम भागात हा अपघात घडला असून याठिकाणी पोहोचण्यासाठी पोलीस दल तसेच महसूल विभागाच्या अधिका-यांना अडचणी येत आहेत. तोरणमाळ व सिंदीदिगर परिसरातील नागरीकांनी बचाव कार्य सुरु केले असून म्हसावद पोलीस ठाण्याचे व तोरणमाळ औटपोस्टचे पोलीस पथक घटनास्थळी पोहोचल्याची माहिती आहे.  सगळा भाग कव्हरेज क्षेत्राबाहेर आणि खडतर असल्याने याठिकाणी मदतकार्य करण्यास अनेक अडथळे निर्माण झाले आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासन स्थानिकांच्या मदतीने याठिकाणी बचाव कार्य करीत असुन जखमींना तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे.  याठिकाणी नेटवर्क नसल्याने अधिक माहिती मिळण्यात अडसर निर्माण होत आहे.

Web Title: At least eight people were killed on the spot when a vehicle crashed into a ravine in Toranmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.