खैरवे धरणाची गळती थांबवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 13:42 IST2019-11-04T13:42:16+5:302019-11-04T13:42:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : खैरवे धरणाच्या उजव्या कालव्याजवळ भगदाड पडल्यामुळे नुकसान झाले. या नुसानीची आमदार शिरीष नाईक यांनी ...

The leakage of the Khairwa dam stopped | खैरवे धरणाची गळती थांबवली

खैरवे धरणाची गळती थांबवली

लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : खैरवे धरणाच्या उजव्या कालव्याजवळ भगदाड पडल्यामुळे नुकसान झाले. या नुसानीची आमदार शिरीष नाईक यांनी पाहणी केली. 
धरणातील पाण्याच्या गळतीमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते तर परिसरातील शेतीचेही मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची आमदार नाईक यांनी पाहणी केली. यावेळी सरपंच रिना दिनेश गावीत, उपअभियंता सुभाम गावीत, ग्राम पंचायत सदस्य अरुण गावीत, हेमंत नाईक व  शेतकरी  आदी उपस्थित होते. सरपंच व ग्रामस्थांनी संबंधित विभागाचे अधिकारी यांना पाण्याच्या गळतीबाबत अवगत करुनही अधिकारी नसल्याने लहान गळतीमुळे मोठे भगदाड पडल्याची बाब ग्रामस्थांनी निदर्शनास आणुन दिली. 
या गळीतमुळे धरणाच्या आजू-बाजूच्या शेतात पाणी शिरल्याने उभ्या पीकांचे मोठे नुकसान झाले होते. संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या दुर्लक्षामुळे बळीराजाचे नुकसान झाल्याने संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यामुळे  आमदार नाईक यांनी संबंधितांवर कारवाईचे संकेत दिले आहे. आमदार नाईक यांनी वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा करून या प्रकरणी चौकशीचे आश्वासन दिले. शेतांमधे पाणी शिरल्याने उभ्या पीकांचे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची सुचना त्यांनी तहसिलदार यांना केली. 
धरण फुटल्याच्या अफवेमुळे नवापूर तालुक्यातील चिमणीपाडा, आसालीपाडा, बोरचक, शेगवे आदी गावातील ग्रामस्थ भयभीत झाले होते. सात जेसीबी यंत्राद्वारे काल सायंकाळी गळती बंद करण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. पाऊस सुरु असल्याने त्यात व्यत्यय येत होता. रात्री उशिरार्पयत गळती बंद करण्यात जलसंपदा विभागाला यश आले होते. सद्यस्थितीत धरण सुरक्षित असून घाबरण्याचे काहीही कारण नाही. दुरूस्तीचे काम पुर्ण झाले असुन धरणाला कोणताही धोका नसल्याची माहिती सहाय्यक अभियंता सुमन गावीत यांनी दिली.
 

Web Title: The leakage of the Khairwa dam stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.