महिला बचत गटांसाठी नेतृत्त्व प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 12:23 IST2019-11-21T12:23:13+5:302019-11-21T12:23:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) मार्फत स्वयंसहायता गटाच्या महिला पदाधिकारी व सदस्या ...

Leadership Training for Women Savings Groups | महिला बचत गटांसाठी नेतृत्त्व प्रशिक्षण

महिला बचत गटांसाठी नेतृत्त्व प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) मार्फत स्वयंसहायता गटाच्या महिला पदाधिकारी व सदस्या यांना नेतृत्त्व प्रशिक्षण देण्यात आल़े 8 ते 18 नोव्हेंबर दरम्यान अक्कलकुवा, तळोदा आणि शहादा येथे हे प्रशिक्षण घेण्यात आल़े 
प्रशिक्षण कार्यशाळेत तीनही तालुक्यातील महिला स्वयंसहायक गटातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला़ कार्यशाळेत लुपिन फाउंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक लक्ष्मण खोसे, महिला विकास महामंडळाचे व्यवस्थापक संजय संगेकर, भारतीय स्टेट बँकेचे धुळे, नंदुरबार, तळोदा, अक्कलकुवा व शहादा येथील शाखा व्यवस्थापक, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक रितेश बागले उपस्थित होत़े या प्रशिक्षण वर्गामध्ये नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक प्रमोद पाटील यांनी जिल्ह्यातील 1 हजार स्वयं सहायता गटांना आर्थिक जोडणी बँकेमार्फत करण्यासाठी बँकांना वेळोवेळी सूचना देणे त्याचा पाठपुरावा करुन महिला स्वयंसहायता गटांना लवकरात लवकर कर्ज कसे मिळेल, नाबार्डमार्फत गटांना सक्षम करण्यासाठी करण्यात येणा:या विकासात्मक कार्यक्रम यासह विविध विषयांची माहिती दिली़ नाबार्डच्या माध्यमातून जिल्ह्यात दीड हजार पेक्षा अधिक गटांची स्थापना करुन बँकेशी जोडण्यात आले आह़े या प्रकल्पाच्या माध्यमातून शेकडो महिलांना भागभांडवल उभे करण्यात आले आह़े तळोदा येथे 8, अक्कलकुवा येथे 14 तर अक्कलकुवा येथे 18 नोव्हेंबर रोजी हे प्रशिक्षण घेण्यात आल़े 
 

Web Title: Leadership Training for Women Savings Groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.