शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

महाविकास आघाडीचा फार्म्यूला नवापूर पालिकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 12:15 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : राज्यात नव्याने अस्तित्वात आलेली महाविकास आघाडी येथील पालिका पोटनिवडणुकीतही पहावयास मिळाली. दोन पैकी एक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : राज्यात नव्याने अस्तित्वात आलेली महाविकास आघाडी येथील पालिका पोटनिवडणुकीतही पहावयास मिळाली. दोन पैकी एक जागा कॉग्रेसच्या व दुसरी जागा सेनेच्या वाटेला आली आहे. भाजपा उमेदवार महाविकास आघाडी विरोधात लढत देत आहेत. दोन्ही जागांसाठी एकुण १० उमेदवारांनी आजअखेर नामांकन दाखल केले आहेत.पालिकेच्या प्रभाग सहा (अ) व सात (अ) या दोन जागांसाठी पोटनिवडणूक होत असुन दोन्ही जागा नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग अश्या राखीव आहे. त्यासाठी नामांकन दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. महाविकास आघाडीत प्रभाग सहा (अ) ची जागा कॉग्रेसच्या वाट्याला तर सात (अ) ची जागा शिवसेनेला मिळाली आहे. प्रभाग सहा (अ) साठी फेमिदा फिरोज फेन्सी यांनी बुधवारी अपक्ष नामांकन दाखल केले होते. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षातर्फे प्रभाग सहा (अ) साठी आज सुरेखा प्रकाश जगदाळे यांनी नामनिर्देशन पत्र भरले. शिवसेनेकडून प्रभाग सात (अ) साठी डॉ. मनोज रमेश चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज भरला. कॉग्रेसचे पालिकेतील गटनेते आशिष मावची, विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे, नगरसेवक अय्युब बलेसरीया, सुभाष कुंभार, धमु पाटील, शिवसेना जिल्हाउपप्रमुख हसमुख पाटील, शहर प्रमुख आबा मोरे, प्रविण ब्रम्हे,अनिल वारुडे, मनोज बोरसे, प्रकाश कुंभार, नितेश गावीत आदी होते. भाजपकडुन व अपक्ष म्हणुन प्रभाग क्रमांक सहा (अ) साठी नैन्सी राकेशकुमार मिस्त्री व जिग्नेशा संदिप राणा यांनी नामनिर्देशन पत्र भरले आहे. भाजप कडुन प्रभाग सात (अ) साठी महेंद्र अशोक दुसाने यांनी नामनिर्देशन भरले. भाजपचे नेते तथा माजी जि.प. अध्यक्ष भरत गावीत, एजाज शेख, रमला राणा, जितेंद्र अहिरे, प्रणव सोनार, समिर दलाल, रवि गावीत, दिनेश चौधरी आदी उपस्थित होते. प्रभाग क्रमांक सात (अ) साठी अपक्ष उमेदवार म्हणून सुनिल धाकु भोई व गणेश भानुदास वडनेरे यांनी नामनिर्देशन भरले.निवडणुक निर्णय अधिकारी महेश शेलार यांच्याकडे सर्व उमेदवारांनी नामांकन अर्ज सादर केले. १२ डिसेंबर २०१९ हा नामनिर्देशन पत्र भरण्याचा अंतिम दिवस होता. एकुण १० उमेदवारांनी दोन्ही जागांसाठी आजअखेर नामांकन दाखल केले आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र शिंदे, कार्यालय अधिक्षक अनिल सोनार, कर निरीक्षक मनोज पाटील, भरत सोनार, रमेश सोनार यांनी काम पाहीले.नवापूर तालुक्यातील राजकारणाचे समिकरणे बदलले आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सध्या जिल्हा परिषद निवडणुका देखील सुरू आहेत. या पोटनिवडणुकीचा निकाल व तयार होणारी समिकरणे ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत देखील परिणामकारक ठरू शकतील अशी शक्यता आहे.