चरणमाळ दरोडय़ातील टोळीचा म्होरक्या अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 11:58 IST2019-07-21T11:58:08+5:302019-07-21T11:58:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : चरणमाळ घाटात दूध संघाची रक्कम लुटून नेल्याची घटना घडली होती़ लुटीची योजना आखून   ...

The leader of the gang of Charakal dacoits | चरणमाळ दरोडय़ातील टोळीचा म्होरक्या अटकेत

चरणमाळ दरोडय़ातील टोळीचा म्होरक्या अटकेत

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापुर : चरणमाळ घाटात दूध संघाची रक्कम लुटून नेल्याची घटना घडली होती़ लुटीची योजना आखून     लुटारुंचे नेतृत्व करणा:या संशयित सुरेश गावीत रा़ सावरट याला नवापुर पोलीसांनी शनिवारी ताब्यात घेतल़े याप्रकरणी यापूर्वी तिघांना अटक करण्यात आली असून दोघे फरार आहेत़ 
चरणमाळ येथील गुलाब मावची हे सहका:यासह मोटार सायकलीने दुध उत्पादक संघाचे सव्वा दोन लाख रुपये शेतक:यांना वाटपासाठी घेऊन जात असताना बोरझर गावाच्या पुढे चरणमाळ घाटात मोटारसायकलवरुन आलेल्या तिघांनी त्गुलाब मावची व सहका:यास मारहाण करुन पैश्यांची बॅग पळवली होती़ याप्रकरणी किशोर देवज्या गावीत व प्रभु होडया गावीत दोन्ही रा.उचीशेवडी ता.नवापूर यांना अटक करण्यात आली होती. योहान गावीत रा.अंठीपाडा ता.नवापूर, रविदास गावीत रा.दापुर ता.नवापूर व सुरेश उर्फ सु-या गावीत रा.सावरट यांच्यासोबत मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली होती़  योहान गावीत, रविदास गावीत व सुरेश गावीत फरार होते. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी शोध पथक केले होत़े पथकाने सावरट येथे सापळा रचून सुरेश गावीत यास अटक केली़ त्याची चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली़
ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक दिपक पाटील, पोलीस कॉन्स्टेब अनिल राठोड, योगेश थोरात, हितेश पाटील, प्रशांत यादव, दिलवर पावरा यांच्या पथकाने केली.
 

Web Title: The leader of the gang of Charakal dacoits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.