पाच वर्षापासून फरार आरोपीस एलसीबीच्या पथकाकडून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 12:19 IST2019-07-30T12:18:52+5:302019-07-30T12:19:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गावठी पिस्तुल आणि चार जिवंत काडतुस बाळगणा:या चौघा आरोपींविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

पाच वर्षापासून फरार आरोपीस एलसीबीच्या पथकाकडून अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गावठी पिस्तुल आणि चार जिवंत काडतुस बाळगणा:या चौघा आरोपींविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आह़े यातील दोघांना अटक तर दोघे फरार झाले होत़े पाच वर्षापासून फरार झालेल्या एकास एलसीबीच्या पथकाने रविवारी पानसेमल (म़प्ऱ) येथून अटक केली़
मार्च 2014 मध्ये शहादा पोलीस ठाण्यांतर्गत चौघांविरोधात 3 पिस्तूल आणि 4 जिवंत काडतूस बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ यातील दोघांना पोलीसांनी अटक केली होती तर दोघे फरार झाले होत़े दोघा फरार आरोपींपैकी शिकलीकर नामक आरोपी रविवारी पानसेमल येथे बाजारात येणार असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती़ त्यानुसार सापळा रचून त्यास पथकाने अटक केली़ ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत व अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप राजपूत, किरण पावरा, मोहन ढमढेरे यांच्या पथकाने ताब्यात घेतले होत़े