जय जय आदिवासी म्हणून केली भाषणाला सुुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 14:15 IST2019-04-22T14:15:00+5:302019-04-22T14:15:19+5:30
नंदुरबार : नंदुरबार येथे आज (सोमवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा होत आहे़ जय जय आदिवासी म्हणून पंतप्रधान ...

जय जय आदिवासी म्हणून केली भाषणाला सुुरुवात
नंदुरबार : नंदुरबार येथे आज (सोमवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा होत आहे़ जय जय आदिवासी म्हणून पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाला आदिवासी भाषेतून सुरुवात केली़ या वेळी त्यांनी नंदुरबारातील चौधरी चहाची आठवण काढत नंदुरबारशी माझे खुप जुने नाते असल्याचे सांगितले़ या वेळी उपस्थितांनी टाळ्याचा एकच कडकडाट केला़
नंदुरबार येथे प्रचार सभेला संबोधित करताना मोदी यांनी सर्वप्रथम उपस्थितांची भारतीय जनता पक्षातर्फे माफी मागितली़ सभेसाठी टाकण्यात आलेला मंडप अपूर्ण पडल्याने अनेक उपस्थित नागरिक मंडपाच्या बाहेर उन्हामध्ये बसले होते़ परंतु तुम्ही भर उन्हामध्ये करत असलेली तपश्चर्या व्यर्थ जावू देणार नाही, असे आश्वस्त करत मोदी यांनी पुढील भाषणाला सुरुवात केली़ पंतप्रधान मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी नंदुरबारातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्स्व्दारे संवाद साधला होता़ तेव्हा घर मिळाल्याच्या आनंदार मोदी यांना मिठाई खाऊ घालण्याचे आश्वासन नंदुरबार येथील लाभार्थ्यांकडून देण्यात आले होते़ त्यामुळे आपण मिठाई खायला व चौधरी यांची चहा प्यायला आतुर असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले़