प्रकाशा येथे श्रीराम कथा सप्ताहाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:29 AM2021-01-21T04:29:08+5:302021-01-21T04:29:08+5:30

‌- शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे आजपासून श्रीराम कथेला प्रारंभ झाला आहे. या कथेचे निरुपण राष्ट्रीय संत श्री श्री १००८ ...

Launch of Shriram Story Week at Prakasha | प्रकाशा येथे श्रीराम कथा सप्ताहाचा शुभारंभ

प्रकाशा येथे श्रीराम कथा सप्ताहाचा शुभारंभ

googlenewsNext

‌- शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे आजपासून श्रीराम कथेला प्रारंभ झाला आहे. या कथेचे निरुपण राष्ट्रीय संत श्री श्री १००८ माँ कनकेश्वरी देवी करीत आहेत. प्रारंभी त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

प्रकाशा येथे कनकेश्वरी देवी यांची ही तिसरी कथा असून, आतापर्यंत त्यांचा दोन कथा प्रकाशा येथे झाल्या आहेत. कथा सप्ताहात कोविड १९ च्या नियमांचे तंतोतंत पालन करण्यात येत असून, कथा श्रवणासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला मास्क लावूनच सभामंडपात बसवले जाते.

या कथेला १९ जानेवारीपासून सुरुवात झाली असून, २५ रोजी समारोप होणार आहे. कथेची वेळ दुपारी दोन वाजेपासून तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत आहे.

प्रारंभी माँ कनकेश्वरी देवी यांनी दक्षिण काशीतीर्थ क्षेत्रातील केदारेश्वर, काशीविश्वेश्वर आणि पुष्पदंतेईश्वराचे दर्शन घेतले. यानंतर संत दगा बापू यांचे दर्शन घेऊन व्यासपीठावर विराजमान झाल्या. यावेळी नर्मदा परिक्रमासाठी आलेल्या भक्तांना यांच्या हस्ते शाल वाटप करण्यात आले.

याप्रसंगी त्यांनी सांगितले की, कोरोना काळात कथा श्रवण करणं हे आपलं भाग्य आहे. उत्तर काशीमध्ये माझ्या कथा झालेल्या आहेत, म्हणून मी दक्षिण काशीमध्ये ज्या ठिकाणी महादेवाचा वास आहे, अशा ठिकाणी ही तिसरी कथा करीत आहे. संतांचे प्रेम आहे म्हणून प्रकाशा येथे दरवर्षी कथा होत असतात. कथा श्रवणासाठी प्रत्येकाने ये-जा करताना प्रत्येकाने कोविड १९ च्या नियमांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Launch of Shriram Story Week at Prakasha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.