अजेपूर येथे ‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ या उपक्रमाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST2021-07-03T04:20:11+5:302021-07-03T04:20:11+5:30

डेल्टा प्लस कोरोनाचा वाढता प्रभाव व तिसरी लाट या भीतीने विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास मज्जाव आहे. विद्यार्थी शिक्षणापासून दुरावले आहेत. ...

Launch of 'School closed, education resumed' initiative at Ajepur | अजेपूर येथे ‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ या उपक्रमाचा शुभारंभ

अजेपूर येथे ‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ या उपक्रमाचा शुभारंभ

डेल्टा प्लस कोरोनाचा वाढता प्रभाव व तिसरी लाट या भीतीने विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास मज्जाव आहे. विद्यार्थी शिक्षणापासून दुरावले आहेत. ऑफलाइन शिक्षण घरोघरी जाऊन देण्यास अडचण येत आहे. शासनाने शिक्षकांना ५० टक्के उपस्थितीत ऑनलाइन शिक्षण देण्यास सांगितले आहे. शाळा बंद, पण शिक्षण सुरू, या उपक्रमात विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंडित राहावे, यासाठी शिक्षक विशाल पाटील यांनी सर्व समस्या व अडथळे यांचे बारीक अवलोकन करून मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, पालक यांची सभा घेऊन चर्चा विनिमय व प्रात्यक्षिक करून, या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. हा उपक्रम दररोज संध्याकाळी सात ते नऊ वाजता गुगल मीटवर घेण्यात येणार आहे. सर्व पालकांनी आपापल्या मोबाइलला गुगल मीट अप्लिकेशन डाऊनलोड केलेले आहे. ते कसे वापरावे, याबाबत माहिती शिकून घेतली आहे. उपक्रमाच्या पहिल्या दिवशी सर्व अधिकारी व गावातील सरपंच, पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या. ग्यान प्रकाशन फाउंडेशनच्या सोनल शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करून मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक नीलेश धावडे व विशाल पाटील यांनी वर्गाध्यापनाला सुरुवात केली. जवळपास २० ते ३० विद्यार्थी व सोबतीला पालक यांनी गटागटाने सहभाग नोंदविला. यात विद्यार्थ्यांचा स्वत:चा परिचय, मागच्या वर्षाचे अभ्यासक्रम अवलोकन, राज्य शासनाचा सेतू अभ्यासक्रम याबाबत प्रश्नोत्तरे व प्रत्यक्ष ऑनलाइन वर्गाध्यापन सुरू केले. बालकांना हा आगळावेगळा, पण आनंददायी अनुभव खूपच आवडला. विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्यात आला. उद्या ऑनलाइन वर्ग शिक्षणात गृहपाठ करून जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहण्यास सांगितले. या प्रकारे अजेपूर येथील विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेणार आहेत.

Web Title: Launch of 'School closed, education resumed' initiative at Ajepur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.