कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत फळबाग योजनेचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST2021-06-30T04:20:09+5:302021-06-30T04:20:09+5:30
मंडळ कृषी अधिकारी विजय मोहिते यांनी माती परीक्षण आधारित पीकनिहाय खत व्यवस्थापन, सोयाबीन पिकासाठी रूंद सरी वरंबा बीबीएफ तंत्रज्ञानाच्या ...

कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत फळबाग योजनेचा शुभारंभ
मंडळ कृषी अधिकारी विजय मोहिते यांनी माती परीक्षण आधारित पीकनिहाय खत व्यवस्थापन, सोयाबीन पिकासाठी रूंद सरी वरंबा बीबीएफ तंत्रज्ञानाच्या वापरामुळे होणारे फायदे व बांधावर खत पुरवठा मोहिमेबद्दल सखोल मार्गदर्शन करताना मूलस्थानी जलसंधारणासाठी मृतसरी काढणे, उताराला आडवी पेरणी, वाफे पद्धत या विषयी सखोल मार्गदर्शन केले. कृषी पर्यवेक्षक करणसिंग गिरासे यांनी बांधावर व सलग फळबाग लागवडीचे हेक्टरी आर्थिक मापदंड व अंमलबजावणीची कार्यपद्धती तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना या विषयी मार्गदर्शन केले. या मोहिमेत शेतकरी गटाचे प्रतिनिधी, प्रगतीशिल शेतकरी यांनी भाग घेतला. मोहिमेसाठी कृषी सहाय्यक सुनील पवार, सुधीर वाघमारे, प्रकाश वसावे, उत्सव पाटील, राजेंद्र गिरासे, हेमंत लाड, पंकज धनगर, बी. सी. बोरसे, विद्या कुवर, नम्रता वळवी, राजाराम इसन पटेल, राहुल वाघ यांनी परिश्रम घेतले.