महामार्ग मृत्युंजय दूत उपक्रमाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:58 IST2021-03-04T04:58:55+5:302021-03-04T04:58:55+5:30
विसरवाडी महामार्ग पोलिसांच्या कार्यक्षेत्रात नवापूर ते विसरवाडी, साक्री, कुसुंबापर्यंत तसेच कोंडाईबारी घाटातील महामार्गावर होणाऱ्या अपघातातील जखमींना वेळेवर उपचार न ...

महामार्ग मृत्युंजय दूत उपक्रमाचा शुभारंभ
विसरवाडी महामार्ग पोलिसांच्या कार्यक्षेत्रात नवापूर ते विसरवाडी, साक्री, कुसुंबापर्यंत तसेच कोंडाईबारी घाटातील महामार्गावर होणाऱ्या अपघातातील जखमींना वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू होण्याची संख्या सर्वाधिक असते. या अपघातातील व्यक्तींना तात्काळ मदत मिळावी व त्यांना रुग्णालयात उपचारासाठी तात्काळ हलविण्यात यावे यासाठी मृत्युंजय दूत या उपक्रमाची स्थापना करण्यात आली असल्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रईस काझी, सहायक पोलीस निरीक्षक राहुल शेजवळ यांनी सांगितले.
या उपक्रमात महामार्गावरील हॉटेल, लोकल ढाबा, हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी आजूबाजूच्या गावातील काही व्यक्तींचा समावेश करून ग्रुप तयार करण्यात येणार आहे व त्यांना मृत्युंजय देवदूत नावाने संबोधण्यात येणार आहे. या व्यक्तींना प्रथमोपचाराबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यांना आवश्यक साधन सामग्री म्हणून प्रत्येक ग्रुपला एक स्ट्रक्चर व प्राथमिक उपचाराचे साहित्य देण्यात येईल. खाजगी व सरकारी रुग्णवाहिकेची माहिती देऊन मदत घेण्यात येईल. या ग्रुपमधील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीला प्रशस्तीपत्र देण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक रईस काझी यांनी सांगितले. या वेळी पोलीस उपनिरीक्षक अमृत पाटील व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.