अंगणवाडीतील पोषण आहारात अळ्या आढळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 13:10 IST2019-09-06T13:10:17+5:302019-09-06T13:10:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील कमरावद येथील बचत गटामार्फत अंगणवाडीतील बालकांना दिल्या जाणा:या पोषण आहारात आळ्या शिजल्या ...

अंगणवाडीतील पोषण आहारात अळ्या आढळल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील कमरावद येथील बचत गटामार्फत अंगणवाडीतील बालकांना दिल्या जाणा:या पोषण आहारात आळ्या शिजल्या गेल्याची गंभीर बाब उघडीस आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहादा तालुक्यातील कमरावद येथे बालविकास प्रकल्पअंतर्गत अंगणवाडी भरविण्यात येते. या अंगणवाडीतील बालकांना बचत गटामार्फत पोषण आहार दिला जातो. बुधवारी सकाळी या अंगणवाडीत तांदळाच्या खिचडीचे वाटप करण्यात आले. या पोषण आहाराच्या खिचडीत अळ्या शिजल्याचे दिसून आले. या गावामध्ये पोषण आहार वाटपाचे काम येथील बचत गटाला दिले असून या बचत गटाचा हलगर्जीपणा दिसून येतो. लहान मुलांच्या जीवाशी खेळ करीत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त होत आहेत. मुलांच्या आरोग्यासाठी जिल्हा पातळीवर ठिकठिकाणी उपाययोजना करून लक्ष देण्याचे आदेश देण्याचे निर्देश देण्यात येत आहे. परंतु येथील अंगणवाडीत पोषण आहारात आळ्या आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. बालविकास प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिका:यांनी लक्ष घालून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.