देहली प्रकल्पाच्या 129 प्रकल्पग्रस्तांना जमिनीची अद्यापही प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 12:45 IST2019-09-25T12:45:39+5:302019-09-25T12:45:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : देहली मध्यम प्रकल्पांतर्गत अंबाबारी, ता.अक्कलकुवा येथील प्रकल्पग्रस्तांमधील 129 लाभाथ्र्याना अद्यापर्पयत जमीन किंवा मोबदल्याची रक्कम ...

देहली प्रकल्पाच्या 129 प्रकल्पग्रस्तांना जमिनीची अद्यापही प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : देहली मध्यम प्रकल्पांतर्गत अंबाबारी, ता.अक्कलकुवा येथील प्रकल्पग्रस्तांमधील 129 लाभाथ्र्याना अद्यापर्पयत जमीन किंवा मोबदल्याची रक्कम मिळालेली नाही.
शासनाने 129 लाभाथ्र्याची यादी जाहीर केली होती. परंतु यातील 27 लाभाथ्र्याना यादीतुन वगळण्यात आले आहे. तसे न होता या 27 लाभाथ्र्याना 129 मध्ये समाविष्ट करून त्यांना जमीन किंवा रोख रक्कम देण्यात यावी. तसेच उर्वरीत लाभाथ्र्याचीही चौकशी करून त्यांनान्याय द्यावा, अशी मागणी अंबाबारी येथील मणिलाल मोहन तडवी, सुपडय़ा गवला तडवी, हिरा गवला तडवी, विजेसिंग महादू वसावे, टोपल्या मोहन तडवी, चंपालाल खालपा तडवी, रणछोड शेरा तडवी, नारायण विजेसिंग तडवी यांनी केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रकल्पग्रस्तांना 692 घरांची नोटीस मिळावी, प्रकल्पग्रस्तांना 692 घरांचा उर्वरित घसारा, 74 मूळ भूमीहीन प्रकल्पग्रस्त लाभाथ्र्याना जमीन मिळावी, प्रकल्पग्रस्त सुुशिक्षित बेरोजगारांना व्यवसाय करणेकामी अनुदान, नवीन गावठाणामध्ये गुरांच्या गोठय़ासाठी 692 लाभाथ्र्याना अनुदान रक्कम, नागरी सुविधामध्ये 10 हातपंप मंजुर करणे, प्रकल्पग्रस्त व सुशिक्षित बेरोजगारांना सरकारी सेवेत नोक:या मिळणे, 18 वर्षावरील मुलांना घर, प्लॉट मिळावा, बुडीत क्षेत्रातील जमीन व डावा कालव्यासाठी जमीन संपादन केली. त्याचे भाडेपट्टा किवा वाढीव रक्कम, रायसिंगपूर गावठाणमध्ये जिल्हा परिषद मराठी शाळेला मंजुरी, पशुसंवर्धन दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी मिळावी, प्रकल्पग्रस्त बिगर आदिवासी 18 लाभाथ्र्याना जिल्हा परिषदांमार्फत प्रधानमंत्री आवास योजनांतर्गत घरकुल योजनेचा लाभ मिळावा, प्रकल्पग्रस्त बुडीत क्षेत्रातील 25 नोकर वर्गाना घरकुल मंजुर करून 25 लाभाथ्र्याना लाभ मिळावा, अंबाबारी गावातील बुडीत क्षेत्रातील रायसिंगपूर गावठाणमध्ये संत कैवल करूणासागर व भाथीजी मंदिर जुना नागरमुठामध्ये हनुमान मंदिर भोयरा गावठाणमध्ये भाथीजी महाराज मंदिर, जिल्हा परिषद केंद्रशाळा अंबाबारी या शाळेत वॉल कुंपनासाठी मंजुरी मिळावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन देहली मध्यम प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणा:या अंबाबारी प्रकल्पग्रस्तांनी लेखी मागणी केली आहे. यावर अंबाबारी येथील मणिलाल मोहन तडवी, सुपडय़ा तडवी, हिरा तडवी, विजेसिग वसावे, टोपल्या तडवी, चंपालाल तडवी, रणछोड तडवी, नारायण तडवी यांनी केली आहे.