लुटमारीत तब्बल १९ लाखांच्या १२८ गाठी केल्या लंपास; नंदुरबार-वाकाचार रस्ता मार्गावरील घटनेने खळबळ, प्रथमच एवढी मोठी लुटमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:33 IST2021-08-22T04:33:26+5:302021-08-22T04:33:26+5:30
या रस्त्यावर पहाटे पाच वाजेपर्यंत वाळू वाहतूक करणारी वाहने मोठ्या प्रमाणावर धावत असतात. असे असतानाही एवढी मोठी लुटमार होत ...

लुटमारीत तब्बल १९ लाखांच्या १२८ गाठी केल्या लंपास; नंदुरबार-वाकाचार रस्ता मार्गावरील घटनेने खळबळ, प्रथमच एवढी मोठी लुटमार
या रस्त्यावर पहाटे पाच वाजेपर्यंत वाळू वाहतूक करणारी वाहने मोठ्या प्रमाणावर धावत असतात. असे असतानाही एवढी मोठी लुटमार होत असताना विशेषता तब्बल १२८ गाठी एका ट्रकमधून दुसऱ्या ट्रकमध्ये लोड करीत असताना कुणाच्याही लक्षात हा प्रकार कसा आला नाही, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
दरम्यान, वाकाचार रस्ता ते नंदुरबार रस्त्यावर रात्री अनेक वेळा लुटमार झाली आहे. वाकाचार रस्त्यापासून अवघ्या एक किलोमीटरच्या आत महाराष्ट्राची हद्द सुरू होते. त्यामुळे याच परिसरात लुटमार करून दुसऱ्या राज्यात पळून जाण्यात चोरटे यशस्वी होतात. त्यामुळे कोरोनाकाळात ज्याप्रमाणे महाराष्ट्र-गुजरात हद्दीवर पोलीस चेक पॉइंट होते त्याप्रमाणे चेक पॉइंट कायमस्वरूपी सुरू ठेवावे, अशी मागणी होत आहे. तसे झाल्यास लुटमारीच्या घटनांना आळा बसू शकेल.