नंदुरबारातील घरफोडीत एक लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 12:19 IST2020-12-20T12:19:11+5:302020-12-20T12:19:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील भोणे रस्त्यावरील वसाहतीतील घरफोडीत चोरट्यांनी एक लाख आठ हजारांचा ऐवज चोरून नेला. शहर ...

नंदुरबारातील घरफोडीत एक लाखांचा ऐवज लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील भोणे रस्त्यावरील वसाहतीतील घरफोडीत चोरट्यांनी एक लाख आठ हजारांचा ऐवज चोरून नेला. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, भोणे रस्त्यावरील विश्वकर्मा मंदीरासमोर राहणा-या आरोग्य विभागातील कर्मचारी वैशाली मधुकर फटकाळ यांच्या बंद घराचा कुलूप कोंडा तोडून चोरट्यांनी घरातील ७० हजार रुपये रोख, १५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने व २३ हजार रुपये किंमतीचा टीव्ही असा ऐवज चोरून नेला. २२ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर दरम्यान ही घटना घडली. याबाबत वैशाली फटकाळ यांनी फिर्याद दिल्याने शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार प्रवीण पाटील करीत आहे. चोरीच्या या घटनेमुळे परिसारात भितीचे वातावरण असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
मद्य पिऊन वाहन चालविल्याने गुन्हा
नंदुरबार : नवापूर येथे मद्य पिऊन वाहन चालविल्याप्रकरणे एकाविरुद्ध नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महामार्गावर नवरंग रेल्वे गेटजवळ ही कारवाई करण्यात आली.
मोहमंद हनिफशेख, रा.सुरत असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस कर्मचारी पंकज सूर्यवंशी यांनी फिर्याद दिल्याने मोहमंद हनिफशेख यांच्याविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.