पातोंडय़ातून 20 हजारांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 12:50 IST2018-06-17T12:50:57+5:302018-06-17T12:50:57+5:30

पातोंडय़ातून 20 हजारांचा ऐवज लंपास
नंदुरबार : पातोंडा येथील भिलाटी भागातून चोरटय़ांनी घरातून 19 हजार 550 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पातोंडा गावातील भिलाटीत राहणा:या अंजुबाई दिनेश नाईक यांचे कच्चे घर आहे. घराच्या मागील दरवाजाची दोरी सोडून चोरटय़ांनी घरात प्रवेश केला. घरातील लाकडी कपाटातून चोरटय़ांनी सहा हजार रुपये रोख, तीन हजार रुपये किंमतीचे सोन्याचे पदक, साडेपाच व साडेचार हजार रुपये किंमतीचे चांदीचे पदक, मोबाईल असा एकुण 19 हजार 550 रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी चोरून नेला.
अंजूबाई नाईक यांच्या लक्षात ही बाब आल्यावर त्यांनी आजूबाजूला शोध घेतला. परंतु उपयोग झाला नाही.
याबाबत अंजूबाई नाईक यांनी शहर पोलिसात फिर्याद दिल्याने चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार भिकाजी वळवी करीत आहे.