पाणीटंचाईने होरपळताय ग्रामस्थ : लोभाणी गावाची स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 12:09 IST2018-04-15T12:09:53+5:302018-04-15T12:09:53+5:30
थकबाकीमुळे महावितरणकडूनही वीजपुरवठा खंडित

पाणीटंचाईने होरपळताय ग्रामस्थ : लोभाणी गावाची स्थिती
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 15 : तळोदा तालुक्यातील लोभाणी येथे गेल्या सहा महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आह़े महावितरणने ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा खंडित केला आह़े पाणीपुरवठा योजनेची थकबाकी असल्याचे कारण सांगत वीजपुरवठा खंडित केल्याने ग्रामस्थांचे ऐन उन्हाळ्यात हाल होत आहेत़
येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी हातपंपावर रांगा लावाव्या लागत आहे. याबाबत प्रशासनाने लक्ष देऊन पाण्याची समस्या दूर करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून येथे पाणीपुरवठयाची समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे ग्रामस्थाना विशेषता महिला वर्गाला पाण्यासाठी तासन्तास हातपंपावर रांगा लावाव्या लागत आहे. उन्हाळा सुरू झाल्याने पाण्याची गंभीर टंचाई जाणवू लागली आहेत.
लोभाणी येथे पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असून येथे मागील काही महिन्यांपासून महावितरणने पाणीपुरवठय़ाची वीज खंडित केली होती़ थकबाकी भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत केला जाणार नसल्याचे ग्रामपंचायतीस कळवले होत़े त्यामुळे ग्रामपंचायतीकडून याबाबत कार्यवाही होणे अपेक्षीत होत़े
मात्र ग्रामपंचायतीने या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने येथील ग्रामस्थ अक्षरश पाण्याअभावी होरपळत आहेत़ साधारण दोन हजार लोकवस्ती असलेल्या गावात ग्रामस्थांसह जनावरांनाही भीषण पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे
येथे गुरांसाठी असलेला हौद पाण्याअभावी रिकामा असून परिणामी हातपंपावर दिवसभर ग्रामस्थाची गर्दी होताना दिसून येत आह़े वास्तविक घरकुल योजनेच्या लाभाथ्र्याकडून गेल्या काही वर्षापासून सक्तीने कर वसुली केली जात़े या ठिकाणी पाण्याची पातळीदेखील मोठय़ा प्रमाणात खालावली आह़े त्यामुळे आधीच येथे पाण्याचा अभाव असून त्यात महावितरणकडून अशा प्रकारे वीजपुरवठय़ाची वीज खंडित करण्यात येत असल्याने ग्रामस्थ जेरीस आले आहेत़ याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देऊन तत्काळ उपाय योजना करावी अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होतेय़