श्रमसंस्कारी विद्यार्थी रंगले कलाविष्कारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 01:17 PM2020-02-15T13:17:11+5:302020-02-15T13:17:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मोलगी : दुर्गम भागातील बहुतांश विद्यार्थ्यांचा शाळा व पालकांप्रमाणेच काबाडकष्ट याशिवाय अन्य बाबींशी फारसा संबंध येत ...

Labor-class student in the art of painting | श्रमसंस्कारी विद्यार्थी रंगले कलाविष्कारात

श्रमसंस्कारी विद्यार्थी रंगले कलाविष्कारात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मोलगी : दुर्गम भागातील बहुतांश विद्यार्थ्यांचा शाळा व पालकांप्रमाणेच काबाडकष्ट याशिवाय अन्य बाबींशी फारसा संबंध येत नाही. शाळेत सांस्कृतिक उपक्रम ही बाब मोकस, पिंपळखुटा या भागातील विद्यार्थ्यांसाठी अंदाजाबाहेरची ठरते. अशातच मोकस ता.अक्कलकुवा येथे प्रथमच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. त्यात या विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केली.
या कार्यक्रमात महिला व बालविकास विभागाचे सभापती निर्मला राऊत, जि.प. सदस्य सी.के. पाडवी, जि.प.चे माजी सदस्य सिताराम राऊत, आपसिंग वसावे, अशोक वसावे, केंद्रप्रमुख सुभाष खैरनार, विस्तार अधिकारी पी.जी. वळवी, सरपंच हानीबाई नाईक, उपसरपंच दिलीप राऊत, सरपंच राज्या वसावे, सुरेश वसावे, केंद्र समन्वयक प्रकाश गावीत, लढा शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष संजय वळवी, पारशी नाईक, सुरेश वळवी, पोलिस पाटील सीमा वळवी आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक ज्ञानासह त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा म्हणून पिंपळखुंटा व वडफळी केंद्राच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी निर्मला राऊत यांनी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे सांगितले. सी.के.पाडवी यांनी विद्यार्थी घडविण्यासाठी हे उपक्रम आवश्यक असल्याचे सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोकस जि.प. शाळेचे मुख्याध्यापक रामजी पाडवी, अमित वळवी, विजय वसावे, केश्वर वसावे, सुनील वळवी यांच्यासह वडफळी व पिंपळखुटा केंद्रातील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Web Title: Labor-class student in the art of painting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.