कुसुमवाडा आरोग्य केंद्रच ‘व्हेंटीलेटर’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 04:07 PM2020-08-12T16:07:35+5:302020-08-12T16:07:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील कुपोषित बालकांचे प्रमाण कमी करण्यासाठी व चांगली आरोग्य सेवा ...

Kusumwada Health Center on Ventilator | कुसुमवाडा आरोग्य केंद्रच ‘व्हेंटीलेटर’वर

कुसुमवाडा आरोग्य केंद्रच ‘व्हेंटीलेटर’वर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील कुपोषित बालकांचे प्रमाण कमी करण्यासाठी व चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी १९८३ मध्ये कुसुमवाडा, ता.शहादा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभारण्यात आली आहे. सद्यस्थिती या आरोग्य केंद्रातील सोयीसुविधांचे तीनतेरा झाले असून जीर्ण इमारत, रिक्त पदे, लोकसंख्येचा विचार न करता अपुरी व्यवस्था, कर्मचाऱ्यांसाठी असलेली गळकी व नादुरुस्त निवासस्थाने, अपूर्ण कर्मचारी आदी समस्यांनी हे प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रासले आहे.
कुसुमवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ग्रामपातळीवर आरोग्य सेवा पुरविण्यासाठी फत्तेपूर, आमोदा, कन्साई, कुसुमवाडा, कुढावद, रामपूर या दुर्गम भागात उपकेंद्र सुरू करण्यात आली आहते. याठिकाणी निवास्थाने काही प्रमाणात चांगली असली तरी प्राथमिक आरोग्य केंद्र कुसुमवाडा येथील कर्मचारी निवासस्थाने जीर्ण झाले असून पूर्णत गळती लागली आहे. छत कोसळलेल्या स्थितीत असल्याने निवासी कर्मचाऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
निवासस्थानांचे बांधकाम निकृष्ट
प्राथमिक आरोग्य केंद्र कुसुमवाडा येथील जुने कर्मचारी निवासस्थान तोडून गेल्या तीन ते चार वर्षापूर्वी नव्याने कर्मचारी निवासस्थान बांधण्यात आले होते. परंतु या निवासस्थानांना गळती लागली असून मध्ये बसवलेल्या फरशी जमिनीत जात असल्याने कर्मचारी भाड्याने घरे घेऊन राहत आहेत. शौचालयांचीही दूरवस्था झाली असून दरवाजे-खिडकी तुटल्याने कर्मचाºयांना पाल, कापड बांधून त्याचा वापर करावा लागत असल्याचे दिसून आले आहे.
इमारत नव्याने बांधण्याची मागणी
१९८२-८३ वर्षी बांधकाम झालेली प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्थाच व्हेंटिलेटरवर आली असून ही इमारत कधीही कोसळून मोठी दुर्दैवी घटना घडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या इमारतीला गळती लागली असून याठिकाणी जुन्या इमारतीवर स्लॅब टाकण्यात येत आहे. परंतु इमारत ४० वर्षे जुनी असून इमारतीवर जास्त वजन झाल्याने ही इमारत कधीही कोसळू शकते. त्यामुळे या इमारतीचे नव्याने बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

कुसुमवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लॅब टेक्निशियन, आरोग्य सेवक, परिचारिका यांच्या सात जागांपैकी चार जागा रिक्त आहेत. त्याचबरोबर शिपाई, क्लर्क, स्लीपर आदी पदे रिक्त असल्याने रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या कोरोनाच्या महामारीत आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून स्थानिक पातळीवर रुग्णांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Web Title: Kusumwada Health Center on Ventilator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.