कुकावल ग्रा.पं. निवडणुकीत ५० वर्षांनंतर परिवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:28 IST2021-01-22T04:28:52+5:302021-01-22T04:28:52+5:30

शहादा तालुक्यातील कुकावल ग्रामपंचायतीवर गेल्या ५० वर्षांपासून एकहाती सत्ता होती. गावाच्या विकासाच्या दृष्टीने ग्रामपंचायतीमध्ये काही प्रमाणात बदल घडावा या ...

Kukaval G.P. Changes in elections after 50 years | कुकावल ग्रा.पं. निवडणुकीत ५० वर्षांनंतर परिवर्तन

कुकावल ग्रा.पं. निवडणुकीत ५० वर्षांनंतर परिवर्तन

शहादा तालुक्यातील कुकावल ग्रामपंचायतीवर गेल्या ५० वर्षांपासून एकहाती सत्ता होती. गावाच्या विकासाच्या दृष्टीने ग्रामपंचायतीमध्ये काही प्रमाणात बदल घडावा या दृष्टिकोनातून सुज्ञ व तरुण मतदारांनी नवीन चेहऱ्याना संधी देत परिवर्तन पॅनलच्या नऊपैकी नऊ उमेदवारांना विजयी केले. राकेश भटू सनेर व राहुल सनेर यांचे लोकशाही तर जयवंत निळकंठ नेरपगार व पंडित अर्जुन नेरपगार यांच्या परिवर्तन ग्रामविकास पॅनलमध्ये सरळ व रंगतदार लढत होती. नऊ जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात होते. या ग्रामपंचायतीत चार जागा अनुसूचित जमातीच्या, दोन ओबीसी संवर्गाच्या व तीन जागा सर्वसाधारण होत्या. त्यात परिवर्तन ग्रामविकास पॅनलचे उमेदवार रंगराज रतन भिल, शोभाबाई जयवंत नेरपगार, लताबाई दगा पाटील, जयवंत निळकंठ नेरपगार, भूपेंद्र संजय देसले, मुमताजअली हारूण मौलापटेल, सुका लालसिंग भिल, कांताबाई पावबा भिल, ललीताबाई गोरख भिल हे विजयी झाले.

Web Title: Kukaval G.P. Changes in elections after 50 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.